बेळगाव : ‘शेअर मार्केट’ हा विषय आज १० पैकी ८ जणांना अवघड वाटतो. शेअर मार्केट संदर्भात आज अनेकजण जागरूक झाले असले तरी शेअर मार्केटसंदर्भात कित्येकांना पूर्ण ज्ञान नाही. सोशल मीडिया आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर मार्केट संदर्भात इत्यंभूत माहिती मिळविणे अवघड आहे. शेअर मार्केटसंदर्भात सवर्सामान्य नागरिकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. मात्र शेअर मार्केट एक अशी गोष्ट आहे जी पूर्णपणे आत्मसात केल्यास आयुष्यभरासाठी आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकते.
आज आपला मराठी समाज म्हणावा तितका आर्थिक साक्षर नाही. कोविड नंतर उद्भवलेली आर्थिक टंचाई हि प्रत्येकासाठी आज मोठी गैरसोयीची ठरली आहे. बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही. योग्य माहितीचा अभाव आणि अनेक प्रकारची चुकीची माहिती यामुळे कित्येक सर्वसामान्य लोक शेअर मार्केटपासून अलिप्त आहेत.
मात्र, शेअर मार्केटसंदर्भात इत्यंभूत, साध्या, सोप्या आणि आपल्या मराठी भाषेत संपूर्ण माहिती जाणून घेण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेअर मार्केटचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी वयाची आणि शिक्षणाची अट नाही. गृहिणी, नोकरदार, निवृत्त कर्मचारी, विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक यासह कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती हा अभ्यासक्रम आपल्या वेळेनुसार कधीही शिकू शकतो.
बेळगावमधील मराठी तरुणांच्या आर्थिक साक्षरतेसाठी आणि प्रगतीसाठी बेळगावमधील ‘भारतीय शेअर मार्केट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ हि सर्वात जुनी आणि अनुभवी इन्स्टिट्यूट सेवेत रुजू झाली आहे.
शेअर मार्केटमधील १२ वर्षांचा अनुभव, प्रशस्त ऑफिस एरिया आणि सुसज्ज क्लासरूमच्या माध्यमातून संपूर्ण शेअर मार्केटसंदर्भातील माहिती देणारा कोर्स आपल्यापर्यंत घेऊन आली आहे. या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आपल्या भाषेत सहज आणि सोप्या पद्धतीने शेअर मार्केटसंदर्भातील माहिती जाणून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
वाढती महागाई, वाढत चाललेले दैनंदिन खर्च आणि यामुळे अर्धवट राहात चाललेली आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतीय शेअर मार्केट इन्स्टिट्यूटला आजच भेट द्या! शेअर मार्केट संदर्भातील संपूर्ण ज्ञान आता आपल्या भाषेतून शिका!