Saturday, May 4, 2024

/

दक्षिणेला एकच उत्तर, रमाकांत कोंडुसकर! हजारोंच्या गर्दीत अर्ज दाखल!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभागात मराठी भाषिकांमध्ये एक नवचैतन्य पसरले आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच समिती आणि मराठी भाषिकांमध्ये एकीच्या नांदीला सुरुवात झाली असून समितीने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तमाम मराठी भाषिकांनी याची प्रचिती आणून दिली आहे.

आज दक्षिण विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनाने आपला अर्ज दाखल केला. हजारो समर्थकांची गर्दी, सीमाप्रश्नाच्या घोषणा, भगवे ध्वज, भगव्या टोप्या, फेटे आणि शाल घालून विजयोत्सवाच्या मिरवणुकीप्रमाणे निर्माण झालेले वातावरण यामुळे आज शहरातील वातावरण मराठीमय झालेले पाहायला मिळाले.

बेळगाव महानगरपालिकेत अर्ज दाखल केल्यानंतर भव्य मिरवणुकीची सुरुवात झाली. पारंपरिक वाद्य, झांजपथक, बैलगाड्या, घोड्यावर स्वार झालेले शिवरायांच्या वेशभूषेतील मावळे, महिलांचा लक्षणीय सहभाग अशा उत्स्फूर्त वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून सुरु झालेल्या मिरवणुक डी सी ऑफिस मार्गे आर टी ओ  सर्कल हून एस पी ऑफिस  महापालिका कार्यालयासमोर येऊन सांगता झाली.Konduskar nomination

 belgaum

‘बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या आणि अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. बैलगाडीतून आपला उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी गेलेल्या रमाकांत कोंडुसकरांसोबत दक्षिण विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अमर येळ्ळूरकर, शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रवी साळुंके आनंद आपटेकर, महादेव पाटील, शुभम शेळके, विकास कलघटगी आदींसह समिती नेते, आजी-माजी नगरसेवक, विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजल्या पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानात मराठी भाषिकांनी गर्दी केली होती मात्र भाजपची रॅली असल्याने समितीच्या उमेदवारांना दुपारी दीड वाजता मिरवणुकीने अर्ज दाखल करण्यास परवानगी मिळाली. जवळपास तीन तासांहून अधिक काळ महिला युवकांनी तापत्या उन्हात गर्दी केली होती. अनेक युवक लहान मुले वृद्ध देखील रॅलीत सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.