Friday, March 29, 2024

/

पाण्यासाठी ‘या’ गल्लीतील नागरिक मोर्चाच्या तयारीत

 belgaum

नळाच पाणी अर्धातास आणि जातं, विहिरीच पाणी आटत असल्याने तेही पुरत नाही, चार महिने झाले बोअर बंद, वेळोवेळी तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही, आता तर 10 दिवस पाणी नाही, ही परिस्थिती आहे रयत गल्ली वडगावची. त्यामुळे पाण्याअभावी सर्वजण त्रस्त झाले असून आता गल्लीतील संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे.

रयत गल्ली वडगावमधे बहुसंख्य शेतकरी असल्याने आजही येथे जास्तीत जास्त 60/70 जनावरं आहेतच. तेंव्हा जनावरांसह घरीही पाणी भरपूर लागते. मात्र रयत गल्लीत गेले 10 दिवस पाणीच आलं नसल्याने अनेकांना विहिरीच पाणी प्याल्याशिवाय पर्याय उरला नव्हता. त्यात आगारीने विहिरीचे पाणी आटत असल्याने ते एक तासही पुरत नाही. गल्लीत पर्याय म्हणून बोअर मारली आहे. तथापि ती देखील बंद पडल्याने पाण्याचे इतके दुर्भिक्ष्य झाले आहे कि पाण्याविना नागरिकांवर कासावीस होण्याची वेळ आली आहे. जनावरांसह घरी पाणीही पुरेनासे झाले आहे.

सध्या जर आठ-दहा दिवसातून एकदा जनतेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येत नसेल तर प्रशासन 24 आज पाणी काय देणार? अशा प्रतिक्रिया व्यक्त होत असून का 24 तास पाणी पुरवठ्याच्या नावाखाली जनतेच्या डोळ्यात नुसती धूळफेक सुरू आहे? असा सवाल केला जात आहे. रयत गल्लीतील बोअर वेल गेल्या चार महिन्यापासून बंद पडली आहे. या संदर्भात संबधीत कार्यालयात वेळोवेळी तक्रार देऊनही त्याची दखल न घेण्यात आलेली नाही.Close boreewell

 belgaum

त्यामुळे पाण्याविना त्रस्त झालेल्या रयत गल्लीतील संतप्त नागरिकांनी आता पाणीपुरवठा खात्याच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान या गल्लीतील ड्रेनेज व्यवस्थेकडे महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे.

त्यामुळे बऱ्याचदा घराघरात सांडपाणी शिरण्याचे प्रकार घडत आहेत. या समस्येला देखील गल्लीतील नागरिक त्रास होऊन गेले असून पिण्याच्या पाण्याची आणि ड्रेनेजची समस्या युद्धपातळीवर सोडविण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.