बेळगाव लाईव्ह : नुकत्याच अस्तित्वात आलेल्या मनपा सभागृहात नूतन महापौर आणि उपमहापौरांच्या सभेत घरपट्टीत कोणतीही करवाढ करण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात आले होते. महानगरपालिकेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात येणार नाही हि बाब समोर आल्याने बेळगावकरातून समाधान व्यक्त करण्यात येत होते. मात्र नगरप्रशासन खात्याने मनपाला पत्र पाठवून घरपट्टी वाढीच्या सूचना केल्याने महापौर-उपमहापौरांची कोंडी झाली आहे.
येत्या आठ दिवसात घरपट्टी वाढीसंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. ३१ मार्चअखेरपर्यंत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश बजावला असून यानुसार १ एप्रिलपासून वाढीव घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे महापालिका प्रशासनाला सादर करावा लागणार आहे.
दर तीन वर्षांनी १५ ते ३० टक्के घरपट्टी वाढ करण्यात येते. पण, गतवर्षी शासनाने नवे बदल केल्याने उपनोंदणी खात्याच्या दरानुसार मालमत्तेची किंमत करून त्यावर घरपट्टी आकारण्याची त्याचप्रमाणे दरवर्षी ठरणाऱ्या उपनोंदणीच्या दरानुसारच घरपट्टी निश्चित करण्याची सूचना केली आहे.
केले आहेत. उपनोंदणी खात्याच्या दरानुसार मालमत्तेची किंमत करून त्यावर घरपट्टी आकारण्याची सूचना नाही, त्यामुळे मागील वर्षीपासून नव्या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढ करण्यात येत आहे. यंदादेखील या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे. मनपा सभेत आमदारांनी करवाढ करण्यात येणार नसल्याची ग्वाही दिली. यावर महापौर-उपमहापौरांनी शिक्कामोर्तब देखील केले. या निर्णयामुळे बेळगावकरांमध्ये समाधान व्यक्त केले गेले. मात्र, आता नगरप्रशासन खात्याने वाढीव घरपट्टीचा आदेश दिल्याने बेळगावकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.