शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी निवडणूकीच्या काळात बेळगाव येथे येऊन वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपाखाली बेळगावच्या न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्या संदर्भात तारखांना हजर न राहिल्यामुळे त्यांच्यावर वॉरंट बजावण्यात आला होता. दरम्यान बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी खासदार संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बेळगाव लाईव्ह च्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत हे उपस्थित राहिले होते. त्याचवेळी निवडणुकांचा काळ होता. त्यांनी केलेल्या विधानांचा विधानांमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा आरोप ठेऊन त्यांच्यावर टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन भाषिक वर्गात तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली कलम 153 ए अन्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यासंदर्भात जेएमएफसी चतुर्थ न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
खासदार संजय राऊत हे तारखांना हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. मात्र आज झालेल्या सुनावणीत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला. प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मुस्तफा हुसैन यांनी जामीन मंजूर केला आहे अशी माहिती ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार यांनी दिली.
३० मार्च २०१८ रोजी बेळगावचे आघाडीचे वेब न्युज चॅनेल ‘बेळगाव लाईव्ह’ या न्युज चॅनलच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात दै. सामनाचे संपादक संजय राऊत, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आणि दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी पोलीस स्थानकातून समन्स बजाविण्यात आले होते.
बेळगाव लाईव्हच्या प्रथम वर्धापनदिनी महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि दै. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३० मार्च २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमात भाषिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
या तिघांना टिळकवाडी पोलीस स्थानकांतर्गत संजय राऊत यांच्यासह किरण ठाकूर आणि प्रकाश बेळगोजी यांना भा. दं. वि. कलम १५३ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदवून समन्स बजाविण्यात आले.याचप्रमाणे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जेएमएफसी क्रमांक ४ या न्यायालयाने तिघांनाही नोटीस बजाविली होती.
बेळगाव live च्या वतीने 2018 साली प्रथम वर्धापन आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या सह मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर देखील उपस्थित होते.
खासदार संजय राऊत यांच्या बरोबरीनेच बेळगाव live चे संपादक प्रकाश बेळगोजी यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे.ज्येष्ठ वकील शामसुंदर पत्तार, मारुती कामानाचे, शंकर बाळ नाईक आणि हेमराज बेंचांनावर हे या हाय प्रोफाईल खटल्याचे काम पाहात आहेत.या खटल्याची पुढील सुनावणी 5एप्रिल रोजी होणार आहे.
खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाकडून मिळाला जामीन@mieknathshinde@rautsanjay61 pic.twitter.com/pp4KJWb0vo
— Belgaumlive (@belgaumlive) February 8, 2023