Thursday, April 25, 2024

/

पंतप्रधानांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बेळगावमध्ये आगमन होणार असून बेळगावमधील विविध ठिकाणच्या विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळा, रेल्वे स्थानकाचे उद्घाटन यासह रोड शो आणि मालिनी सिटी येथे व्यासपीठावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यादरम्यान शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

* निपाणी, कोल्हापूर, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकती याभागातून बेळगाव शहरात प्रवेश घेऊन खानापूर-गोव्याकडे जाणार्या वाहनांनी हिंडाल्को अंडर ब्रिज, बॉक्साइट रोड, फॉरेस्ट नाका, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य सर्कल मार्गे थिमय्या मार्ग,

केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क, इंडिपेडन्स मार्ग, गवळी गल्ली, फर्नांडिस मार्ग,नेल्सन मार्ग, मिलिटरी महादेव मंदिर, काँग्रेस रोडमार्गे पुढे जायचे आहे.

 belgaum

* शहापूर, अनगोळ, वडगाव, येळ्ळूर, बाची काकती, निपाणी कडे जाणार्या वाहनांनी अनगोळ, चौथे रेल्वे गेट, बेंको सर्कल, तिसरे रेल्वे गेट, काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिर कडून वळसा घेऊन थिमय्या मार्ग, शौर्य चौक, गांधी सर्कल, बॉक्साइट रोडमार्गे मार्गस्थ व्हायचे आहे.Pm visit

* बेळगाव शहरातून काकती, निपाणी, कोल्हापूर, अथणी कडे जाणाऱ्या वाहनांनी कृष्णदेवराय सर्कल, हॉटेल रामदेव, केएलईएस रुग्णालय, के.एल.एस. छत्री मार्गे राष्ट्रीय मागमार्ग क्रमांकः४ च्या दिशेने मार्गस्थ व्हायचे आहे.

* हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडी येथून बेळगाव शहरात येणाऱ्या वाहनांना आलारवाड ब्रिज, मुचंडी गॅरेज आणि कँसर हॉस्पिटल समोर असलेल्या रस्त्यावरून जाण्यास मनाई आहे. या वाहनांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर असलेल्या निसर्ग ढाबा जवळील रस्त्यावरून के एल इ एस मार्गावरून पुढे मार्गस्थ व्हायचे आहे.

गोवा आणि खानापूर कडे जाणाऱ्या वाहनांनी राष्ट्रीय मागमार्ग क्रमांक ४ मार्गे पुढे जाऊन के एल इ एस बायपास जवळील सर्व्हिस रोड मार्गे शिवालय क्रॉस, बॉक्साइट रोड मार्गे पुढे जायचे आहे.Rural society

* बेळगाव शहरातून गोकाक, हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडी कडे जाणाऱ्या वाहनांनी संगोळी रायन्ना सर्कल, कृष्णदेवराय सर्कल, हॉटेल रामदेव, के एल इ एस मार्ग, के एल इ एस बायपास, हिंडाल्को अंडर ब्रिज मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून पुढे जायचे आहे.
* वेंगुर्ला, सावंतवाडी, हिंडलगा, सुळगा येथून राष्ट्रीय मागमार्ग क्रमांक ४ मार्गे येणाऱ्या वाहनांना फॉरेस्ट नाक्याजवळून प्रवेश घेण्यास मनाई आहे. या वाहनांनी बॉक्साइट रोड मार्गे, हिंडाल्को अंडर ब्रिज वरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वर पुढे जावे.
* विजापूर, बागलकोट, यरगट्टी, नेसरगी येथून बेळगाव शहरात येणाऱ्या वाहनांनी मारिहाळ पोलीस स्थानकाजवळून उजवीकडे वळून सुळेभावी गावातून खणगाव क्रॉसमार्गे कणबर्गी मार्ग, कनकदास सर्कल, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गे निसर्ग ढाबा जवळून डावीकडे केपीटीसीएल मार्गे शहरात प्रवेश घ्यावा.
* बेळगाव शहरातून सांबरा, नेसरगी, यरगट्टी, बागलकोट, विजापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी बेळगाव-गोकाक राज्य महामार्गावरून पुढे जाऊन खणगाव क्रॉस, सुळेभावी गावातून बागलकोट मार्गे पुढे जावे.

* Y-जंकशन, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, हेमुकलानि चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर ओव्हर ब्रिज, बँक ऑफ इंडिया चौक, नवीन डबल रोड, जुना पी बी रोड, पॅटसन शोरूम, धारवाड नाका कडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
* दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी ८ते रात्री ८पर्यंत सर्व अवजड वाहनांना शहरातील सर्व दिशांनी शहरात संचार करण्यात मनाई आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.