Sunday, September 1, 2024

/

पीयूसी प्रथम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बेळगाव दौऱ्यावर येत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पीयूसी प्रथम वर्षाच्या सोमवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व शासकीय,अनुदानित, विनाअनुदानित पदवीपूर्व महाविद्यालयात २७ फेब्रुवारीपासून वार्षिक परीक्षा घेण्यात येणार होत्या. मात्र बेळगावमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित झाल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण विभागाच्यावतीने जारी करण्यात आली आहे.

सदर परीक्षा सोमवार दि. ६ मार्च २०२३ पासून पुन्हा घेण्यात याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत. सदर परिपत्रक केवळ पदवीपूर्व विभागाच्या पहिल्या वर्षाशी निगडित असून सोमवारपासून सीबीएसई अभ्यासक्रमाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षाही घेण्यात येणार आहेत.

शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने अनेक ठिकाणचे मार्ग बंद आहेत. याची दखल घेऊन पालकांनी मुलांना परीक्षेसाठी वेळेत शाळेत सोडणे गरजेचे आहे.

पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल

पंतप्रधानांच्या बेळगावदौऱ्यादरम्यान शहराच्या वाहतूक मार्गात बदल

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.