मुंबई येथे येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनासाठी जे कार्यकर्ते येत आहेत. त्यांची मुंबई येथे सकाळच्या अंघोळीसह इतर व्यवस्था करण्यात आली आहे, तरी कार्यकर्त्यांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे करण्यात आले आहे.
समितीच्या आवाहनानुसार ‘मुंबई चलो’ आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मंगळवारी खालील दिलेल्या प्रमाणे आपापल्या ठिकाणी जाऊन अंघोळ वगैरे आटोपून आझाद मैदान येथे सकाळी 10.00 वाजता पोहोचायचे आहे.
कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची सूचना करण्यात येत आहे की खालील दिलेल्या ठिकाणी कांही शैक्षणिक कॉलेज आहेत. तेंव्हा तेथे राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी योग्य ती स्वच्छता राखली जाईल याची काळजी घ्यावी. रेल्वेने येणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंगळवार दि. 28 रोजी सकाळी 7.00 पर्यंत भारती क्रीडा मंदिर, सीपीएड कॉलेज, नायगाव क्रॉस -वडाळा येथे पोहोचायचे आहे. त्यांनी त्याठिकाणी ॲड. एम. जी. पाटील (9448437141), आर. एम. चौगुले (9448487595) किंवा भागोजीराव पाटील 9035387021 यांच्याशी अधिक संपर्क साधावा.
बेळगाव पश्चिम भागातील कार्यकर्त्यांची पनवेल येथील रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज डोंगरा, पनवेल आणि आणखीन एक ठिकाण म्हणजे आव्हाड आयपी पनवेल येथे व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माजी आमदार मनोहर किणेकर (9448486254), शिवाजी सुंठकर (9448849887), आर. आय. पाटील (9448161763) किंवा पुंडलिक पावशे (8861304644) यांच्याशी अधीक संपर्क साधावा. तसेच पूर्व भागातील कार्यकर्त्यांनी वाशी, नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज सेक्टर नं. 15/A या ठिकाणी पोचायचे आहे.
त्यांनी अधिक माहितीसाठी सुनील अष्टेकर (9448274989) अथवा रामचंद्र मोदगेकर (9972521062)यांच्याशी संपर्क साधावा. या व्यतिरिक्त कांही शंका असल्यास कार्यकर्त्यांनी अधिक माहितीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ॲड. एम. जी. पाटील (9448437141) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.