Monday, May 6, 2024

/

वैशाली भातकांडे यांनी समितीशी एकनिष्ठ राहावे :

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापौरपदी भाजपचे तुल्यबळ अधिक असल्याने भाजपाचीच सत्ता मनपावर येणार असल्याचे जगजाहीर होते.

हि निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात आल्याने भाजप नगरसेवकच महापौर पदी विराजमान होणार हे प्रत्येकाला माहित होते. दरम्यान अचानक आरक्षण जाहीर झाल्याने उपमहापौर पद हे ओबीसी बी वर्गासाठी राखीव ठेवण्यात आले. आणि यानुसार केवळ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली निवडणूक लढविलेल्या भांदूर गल्ली येथील सौ. वैशाली सिद्धार्थ भातकांडे या सध्या पर्यंत एकमेव उमेदवार या निवडणुकीसाठी पात्र ठरल्या आहेत

आरक्षणानुसार सौ. वैशाली भातकांडे यांनी प्रमाणपत्र मिळविले आहे. याचबरोबर काँग्रेसकडूनही सौ. ज्योती कडोलकर या प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खटाटोप करत आहेत. मात्र अद्याप त्यांना प्रमाणपत्र न मिळाल्याने उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध पार पडण्याची दाट शक्यता आहे.

 belgaum

महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. मात्र तीन प्रभागात समिती नगरसेवक निवडून आले असून उपमहापौर पद समितीला मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आरक्षणानुसार सौ. वैशाली भातकांडे या एकमेव उमेदवार उपमहापौर पदासाठी पात्र ठरल्या आहेत. यामुळे वैशाली भातकांडे यांनी राष्ट्रीय पक्षांच्या वळचणीला न जाता महाराष्ट्र एकीकरण समितीशी एकनिष्ठ राहून समितीचा झेंडा फडकावत ठेवाव्यात अशा सूचना समिती नेत्यांनी केल्या आहेत. यानुसार वैशाली भातकांडे यांना समिती नेत्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले आहे.

आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीतही या विषयावर चर्चा करण्यात आली असून वैशाली भातकांडे यांनी समितीच्या झेंड्याखालीच निवडणूक लढवावी अशी मागणी या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सौ. वैशाली भातकांडे यांना राष्ट्रीय पक्षांकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. मात्र कर्तव्य, स्वाभिमान आणि समितीनिष्ठा याचप्रमाणे तमाम मराठी भाषिकांच्या भावना लक्षात घेऊन सौ. वैशाली भातकांडे यांनी समितीशी एकनिष्ठ राहावे, अशी मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान भाजप कडून देखील अनगोळ येथील एका महिला उमेदवारास हे प्रमाणपत्र मिळवण्याच्या हालचाली सुरू आहेत तसे झाल्यास भातकांडे यांच्या ऐवजी सदर उपमहापौर पद भाजप मधील महिला उमेदवाराला मिळू शकते मात्र अद्याप अनगोळ येथील त्या महिला उमेदवाराला अद्याप ते प्रमाण पत्र मिळालेले नाही.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.