Sunday, January 26, 2025

/

व्हक्सिन डेपो वरील त्या कॅच चे जगभरातून कौतुक

 belgaum

बेळगाव शहरातील वक्सीन डेपो मैदानावर सुरू असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर टिपलेल्या त्या कॅच चे जगभरातून कौतुक होत आहे. देश विदेशातील आंतर राष्ट्रीय अनेक दिग्गज क्रिकेट खेळाडूंनी या कॅच छा vdo ट्विट करत कौतुक केलं आहे.

बेळगाव वक्सीन डेपो मैदानावर बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल जगभर प्रसिद्ध झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सह न्युझीलंड अष्टपैलू खेळाडू जिमी निशम इंगलन माजी कर्णधार मायकेल वानने ट्विटर वर ट्विट करत शेअर केला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील ‘त्या’ अफलातून झेलाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर लिंकवर शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे.

 belgaum

सध्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या एसआरएस संघाविरोधीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल साईराज वॉरियर्सच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता. या झेलाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला आहे. ‘हे तेंव्हाच घडतं जेंव्हा ज्याला फुटबॉल देखील खेळता येतो अशा खेळाडूला तुम्ही आणता’ (दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन यू ब्रिंग अ गाय हू अल्सो नोस हाऊ टू प्ले फुटबॉल) अशा शब्दात किरण तळेकर यांनी पकडलेल्या झेलाचा व्हिडिओ सचिनने शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे.

भारताच्या महान फलंदाजांपैकी एक असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने दोन महिन्यापूर्वीच गोव्याला जाताना मच्छे येथील एका चहाच्या कॅन्टीनमध्ये चहाचा स्वाद घेत बेळगावबद्दल आपुलकीचे उद्गार काढले होते. जगातील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेला सचिन तेंडुलकर एका साध्या चहा कॅन्टीनमध्ये चहा पिऊन जाण्याची ती घटना त्यावेळी चर्चेचा विषय झाली होती. आता पुन्हा एकदा टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तेंडुलकर यांनी स्वतःच्या ट्विटर लिंकवर बेळगावचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आहे. त्यामुळे बेळगाव राष्ट्रीय तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहे असे म्हणण्यास हरकत नाही.Sachin neesham waughn

एकंदर बेळगावचे टेनिस क्रिकेट आता राष्ट्रीय स्तरावर झळकू लागले आहे. अलीकडेच यशस्वीरित्या संपन्न झालेल्या आमदार अनिल बेनके चषक खुल्या राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातील मातब्बर खेळाडूंनी सहभाग दर्शविल्यामुळे त्याची मोठी चर्चा झाली होती. व्हॅक्सिन डेपो मैदानावरील श्री चषक क्रिकेट स्पर्धेतील किरण तरळेकर यांच्या झेलामुळे पुन्हा एकदा बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट चर्चेत आले आहे.

बेळगाव व्हॅक्सिन डेपो मैदानावर बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल जगभर प्रसिद्ध झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह न्युझीलंड अष्टपैलू खेळाडू जिमी निशम इंगलन आणि माजी कर्णधार मायकेल वान यांनी देखील त्याची दखल घेतली आहे. या उभ्या त्यांनी आपल्या ट्विटरवर ट्विट करत झेलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.