Wednesday, October 9, 2024

/

हे’ 58 नगरसेवक बजावणार मतदानाचा हक्क

 belgaum

बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक आज सोमवारी 6 फेब्रुवारी 2023 रोजी महापालिका निवडणुकीनंतर तब्बल 518 दिवसांनी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी सर्व 58 नगरसेवक आज मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

यावेळी महापौर पद सामान्य महिला आणि उपमहापौर पद इतर मागास ‘ब’ प्रवर्ग असे राखीव ठेवण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेत निवडून गेलेल्या 58 नगरसेवकांची नावे (अनुक्रमे प्रभाग क्रमांक, नांव आणि पक्ष यानुसार) पुढील प्रमाणे आहेत.1) इक्रा मुल्ला (अपक्ष), 2) मुझमील डोणी (काँग्रेस), 3) ज्योती कडोलकर (काँग्रेस), 4) जयतीर्थ सौंदत्ती (भाजप), 5) आफ्रिजा मुल्ला (काँग्रेस), 6) संतोष पेडणेकर (भाजप), 7) शंकर पाटील (अपक्ष), 8) सोहेल संगोळ्ळी (काँग्रेस), 9) पूजा पाटील (अपक्ष), 10) वैशाली भातकांडे (अपक्ष), 11) समीउल्ला माडीवाले (काँग्रेस), 12) मदीनसाब मतवाले (अपक्ष), 13) रेश्मा भैरकदार (काँग्रेस), 14) शिवाजी मंडोळकर (अपक्ष), 15) नेत्रावती (भाजप), 16) राजू भातकांडे (भाजप), 17) सविता कांबळे (भाजप), 18) शाहिदखान पठाण (एआयएमआयएम), 19) रियाज किल्लेदार (अपक्ष), 20) शकीला मुल्ला (काँग्रेस), 21) प्रीती कामकर (भाजप), 22) रविराज सांबरेकर (भाजप), 23) जयंत जाधव (भाजप), 24) गिरीश धोंगडी (भाजप), 25) जरीना फतेखान (अपक्ष),

26) रेखा हुगार (भाजप), 27) रवी साळुंखे (अपक्ष), 28) रवी धोत्रे (भाजप), 29) नितीन जाधव (भाजप), 30) नंदू मिरजकर (भाजप), 31) विणा विजापुरे (भाजप), 32) संदीप जे. (भाजप), 33) रेश्मा पाटील (भाजप), 34) श्रेयश नाकाडी (भाजप), 35) लक्ष्मी राठोड (भाजप), 36) राजशेखर डोनी (भाजप), 37) शामोबिन पठाण (काँग्रेस), 38) मोहम्मद पटवेगार (अपक्ष), 39) उदयकुमार उपरी (भाजप), 40) रेश्मा कामकर (भाजप), 41) मंगेश पवार (भाजप), 42) अभिजीत जवळकर (भाजप), 43) वाणी जोशी (भाजप), 44) आनंद चव्हाण (भाजप), 45) रूपा चिकलदिनी (भाजप), 46) हेमंत कोंगाली (भाजप), 47) अस्मिता पाटील (अपक्ष), 48) बसवराज मोदगेकर (अपक्ष), 49) दिपाली टोपगी (भाजप), 50) सारिका पाटील (भाजप), 51)

श्रीशैल कांबळे (भाजप), 52) खुर्शिदा मुल्ला (काँग्रेस), 53) रमेश मालीगोळ (भाजप), 54) माधवी राघोचे (भाजप), 55) सविता पाटील (भाजप), 56) लक्ष्मी लोकरी (काँग्रेस), 57) शोभा सोमनाचे (भाजप), 58) प्रिया सतगौड (भाजप). हे सर्व नगरसेवक आजच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

Congress corporator

शोभा सोमणाचे आणि रेश्मा पाटील यांचे नाव आघाडीवर…

महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी
अनगोळ येथील नगरसेविका शोभा सोमनाचे तर शाहू नगरच्या नगरसेविका रेश्मा पाटील यांची नावे आघाडीवर असून दोघीही नगरसेविकांनी नामांकन दाखल केले आहे. भाजप कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकीत महापौर उपमहापौर उमेदवार अंतिम करण्यावर सविस्तर चर्चा झाली असून त्या बैठकीत शोभा सोमाणाचे यांची महापौर तर रेश्मा पाटील यांची उपमहापौर पदी निवड करण्याचे शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

दोन्ही उमेदवारांनी सकाळीच नामांकन केले असून दुपारी तीन वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.महापौर पदासाठी काँग्रेसने निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्याने महापौर निवडणूक बिन विरोध होण्याची शक्यता आहे तर उपमहापौर पदासाठी रेश्मा पाटील आणि समितीच्या वैशाली भातकांडे यांच्यात निवडणूक होऊ शकते.
सत्तारूढ गट नेते पदी राजू डोणी यांची भाजप कोअर कमिटीने निवड केली असल्याचे समोर येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.