बेळगाव लाईव्ह : उचगाव येथील जागृत मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताह सोमवार दि. ६ मार्च २०२३ ते रविवार दिनांक १२ मार्च २०२३ पर्यंत होणार असून या सप्ताहानिमित्त यावर्षी “भारुडी भजन स्पर्धांचे” आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी एक लाख रुपयाची बक्षिसे ठेवण्यात आली असून याचा भारूड भजन संघानी लाभ घ्यावा, असे आवाहन मळेकरणी सप्ताह उत्सव कमिटीने केले आहे.
होळी, शिमगा उत्सवात श्री मळेकरणी देवी सप्ताह मोठ्या उत्साही वातावरणात दरवर्षी साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे करमणुकीच्या कार्यक्रमांना ब्रेक लागला होता. मात्र यावर्षी पुन्हा या सप्ताह काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील संघ भाग घेऊ शकतात. एकूण स्पर्धकांमध्ये तीन विजेत्या स्पर्धकांची निवड करण्यात येणार असून पहिल्या क्रमांकासाठी ५१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३१ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी २१ हजार रुपये असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
इच्छुक स्पर्धकांनी २ मार्च २०२३ पर्यंत मळेकरणी देवी सप्ताह उत्सव कमिटी अथवा एल. वाय लाळगे ( ९९६४७४०१८६) शरद होनगेकर ( ७३४९१००५९०),महेश कुंडलकर (८४९४८३८०६५) यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.