Friday, April 26, 2024

/

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत ऊस भस्मसात

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सांबरा या गावातील ऊस उत्पादक शेतकरी सुनील देसाई आणि धनंजय देसाई यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे.

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने पाहता पाहता पेट घेतला आणि देसाई बंधूंच्या शेतातील ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता.Shugar cane burnt

यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य काशिनाथ धर्मोजी त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांची जमवाजमव करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. नागेश देसाई यांनी अग्निशामक दलाला बोलावले मात्र तोवर ऊस आगीत भस्म झाला होता.

 belgaum

आसपासच्या शेतकऱ्यांनीही आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हे प्रयत्नदेखील फोल ठरल्याने ऊस जळून खाक झाला. घटनास्थळी  पोलिस  हेस्कॉम अधिकारी तलाठ्यांनी पंचनामा केला असून नुकसान भरपाईसंदर्भात पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

शेतातून जाणाऱ्या हाय टेन्शन विद्युत तारामुळे शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असून जवळपास 70टन ऊस आगीत जळून खाक झाला आहे अंदाजे दोन ते अडीच लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यानिमित्ताने वाढू लागली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.