बेळगाव लाईव्ह : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील व्यक्ती पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला असून पुण्याहून बंगळूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने अज्ञात व्यक्तीला धडकल्याने वृत्त आहे.
उज्वल नगर जवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना हि घटना झाली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वाहनांची धडक इतकी भीषण होती कि या धडकेत सदर व्यक्तीच्या शरीराचा चुराडा झाला आहे.
सदर व्यक्तीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागरात हलविण्यात आला असून अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची तसेच अज्ञात वाहनाची तपास प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे.




