Friday, May 3, 2024

/

बेळगाव महापौर, उपमहापौर आरक्षण जाहीर

 belgaum

नगर विकास खाते व शहर विकास सचिवालयाने बेळगाव महानगरपालिकेच्या 21 व्या कालावधीतील महापौर आणि उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार बेळगाव महापौरपद सामान्य महिला आणि उपमहापौरपदमागासवर्गीय महिला ‘ब’ श्रेणी असे आरक्षित आहे.

नगर विकास खाते व शहर विकास सचिवालयाने कर्नाटक राजपत्राद्वारे राज्यातील बेळगावसह बेळ्ळारी, बेंगळूर, दावणगिरी, हुबळी -धारवाड, कलबुर्गी, मंगळूर, म्हैसूर, शिमोगा, तुमकुर आणि विजापूर या महानगरपालिकांच्या महापौर व उपमहापौर पदाचे आरक्षण काल सोमवारी जाहीर केले आहे.

त्यानुसार बेळगाव महापौरपद सामान्य महिला (जीडब्ल्यू) आणि उपमहापौरपद मागासवर्गीय महिला ‘ब’ श्रेणी (बीसीबीडब्ल्यू) असे आरक्षित आहे. उर्वरित अन्य महानगरपालिकांची आरक्षणं (महापालिकेचे नाव, महापौर, उपमहापौर पदाची आरक्षण यानुसार) पुढील प्रमाणे असणार आहेत.

 belgaum

बेळ्ळारी: जीडब्ल्यू -जी, बेंगलोर :एसटीडब्ल्यू -एससी, दावणगिरी :जी -बीसीएडब्ल्यू, हुबळी धारवाड :जी -जीडब्ल्यू, म्हैसूर :जीडब्ल्यू -बीसीए, शिमोगा :एससीडब्ल्यू -जी, तुमकुर :बीसीएडब्ल्यू -एससीडब्ल्यू, विजयपुरा :जी -एसटी.

बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर उपमहापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले असले तरी निवडणूक कधी होणार याची घोषणा प्रादेशिक आयुक्त करणार आहेत दरम्यान पुढील महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर महापौर निवडणूक व्हावी अशी गरज व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.