Monday, March 10, 2025

/

सुवर्ण सौधच्या फेरफटक्यासाठी ई -बाईक्सची सोय

 belgaum

बेळगावातील सुवर्ण विधानसौधचा परिसर मोठा आहे. हा परिसर पायी फिरून पाहता येणे कष्टाचे असल्यामुळे अधिवेशन काळात म्हणजे 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत सुवर्णसौधमध्ये जाणाऱ्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून ई -बाईक्स विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी ही माहिती दिली असून बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान ज्यांच्याकडून या ई -बाईकचा वापर होईल, त्यांच्याकडून शुल्क आकारणी केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अधिवेशन 30 डिसेंबर रोजी संपणार असले तरी त्यानंतर देखील सुवर्ण सौधमध्ये या ई-बाईक्स उपलब्ध असणार आहेत. मात्र त्यावेळी 15 ते 20 रुपये शुल्क आकारणी केली जाणार आहे. बेळगावातील सुवर्ण विधानसौध परिसर मोठा आहे. सुवर्णसौध इमारत व परिसर पाहण्यासाठी अधिवेशन काळात उत्तर कर्नाटकातील नागरिक मोठ्या संख्येने येतात.

त्यांच्या वाहनांना मुख्य प्रवेशद्वारातून आत सोडले जात नाही. त्यामुळे सुवर्ण सौध परिसराची पाहणी पायी चालत करावी लागते. त्यासाठीच यंदा त्यांच्यासाठी ई-बाईक्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासाठी एक तात्पुरते डॉकयार्ड तयार करण्यात आले आहे.

E bikes
File pic e bikes

अधिवेशन काळात सुवर्णसौधमध्ये प्रवेश करण्यासाठी पास दिला जातो. यंदा अधिकारी, कर्मचारी व नागरिकांसाठी देखील ई -पास दिले जात आहेत. त्यावरील क्यू -आर कोड स्कॅन केल्यानंतरच आज प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ई -पास घेऊन सुवर्ण सौधमध्ये प्रवेश केल्यानंतर ई -बाईकच्या माध्यमातून संबंधितांना फेरफटका मारता येणार आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात शहराच्या दक्षिण व उत्तर विभागात बाईक शेअरिंग योजनेचा प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांसाठी ई-बाईक्स भाड्याने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ई -बाइक्सच्या वापरामुळे बेळगावातील वाहतूक कोंडी, पार्किंग व प्रदूषण समस्या दूर होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.