Thursday, May 23, 2024

/

सागरी जलतरण स्पर्धेत ‘या’ जलतरणपटूंचे सुयश

 belgaum

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेतर्फे आयोजित विविध वयोगटातील मुला मुलींच्या सागरी जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबच्या जलतरणपटूंनी भरघोस यश संपादन केले.

मालवण येथील चिवला बीच समुद्रामध्ये घेण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत सुमारे 800 जलतरणपटूंचा सहभाग होता. त्यामध्ये बेळगावच्या कु. स्मरण मंगळूरकर याने ग्रुप 5 मध्ये 5 कि. मी. पोहण्याच्या शर्यतीत 37.03 मिनिटाचा अवधी देत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले.

दिव्यांगाच्या स्पर्धेत ग्रुप 11 मध्ये कु. ओम जुवळी याने 1 कि. मी. स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. कु. आदित्य गडकरी याने ग्रुप 4 मधील 5 कि. मी. शर्यतीत तिसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक संपादले. मुलींच्या गट क्र. 1 मध्ये कु. दिशा होंडी हिने 1 कि. मी. स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकासह रौप्य पदक पटकाविले,

 belgaum

तर कु. आरोही चित्रगार हिने याच गटामध्ये आठवा क्रमांक मिळविला. कु. श्रेष्ठा रोटी हिने ग्रुप 3 मध्ये आणि कु. युवराज मोहनगेकर याने ग्रुप 2 मध्ये दहावा क्रमांक मिळवला.Swimming

सर्व यशस्वी स्पर्धकांना आयोजकातर्फे प्रशस्तीपत्र, पदक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कु. धवल हनमनावर, सुमेध गडकरी, राधिका मोहनगेकर, वैजनाथ सोनपनावर, अमोघ परमाज, अद्वैत जोशी व ओवी जाधव यांनी देखील या स्पर्धेत भाग घेऊन ती यशस्वीरित्या स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धेत सहभागी सर्व जलतरपटूंना आबा व हिंद स्पोर्ट्स क्लबचे जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव, संदीप मोहिते, मारुती घाडी, शिवराज मोहिते, रणजीत पाटील व किशोर पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन तसेच क्लबचे पदाधिकारी ॲड. मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अरविंद संगोळी व शुभांगी मंगळूरकर यांचे प्रोत्साहन लाभत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.