बेळगाव तालुक्यातील मुचंडी गावचा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा मल्ल अतुल शिरोळे याने मातीच्या खळ्यात आपला दमदार खेळ दाखवताना आपल्याचं गावचे मैदान गाजवलं आहे.
मुचंडी गावची ग्रामदैवत सिद्धेश्वरच्या वार्षिक यात्रा उत्सवानिमित्त मुचंडी येथे कुस्तीचा आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते या आखाड्यांमध्ये अनेक लहान-मोठ्या कुस्त्या ठेवण्यात आल्या होत्या.
प्रथम क्रमांक एकच्या कुस्तीमध्ये त्याच गावचा पैलवान अतुल शिरोळे विरुद्ध कोल्हापूरचा संकेत यांच्यात कुस्ती झाली. या कुस्तीमध्ये पाचव्या मिनिटाला अतुल शिरोळे याने पाचव्या मिनिटाला धोबीपछाड डावावर कोल्हापूरच्या संकेत पैलवानला चितपट करत मुचंडीचा मैदान मारत उपस्थितांच्या कडून वाहवा मिळवली.
सुरुवातीला पंचाच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली आणि कुस्ती जिंकल्यानंतर विजेता पैलवान अतुल शिरोळे याला रोख रक्कम बक्षीस देण्यात आले.
अतुल शिरोळे याने या अगोदर मॅटवरच्या कुस्त्यात चमकदार खेळ दाखवताना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्त्या जिंकल्या आहेत आता आपल्या गावची दंगल जिंकत त्याने मातीत देखील यश मिळवण्यास सज्ज आहोत हे दाखवून दिले आहे.