Friday, November 15, 2024

/

वीर सावरकरांच्या प्रतिमेवरून विरोधी पक्षाचे आंदोलन

 belgaum

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुवर्ण विधानसौध बेळगाव येथे प्रारंभ झाला असून हे अधिवेशनाचे 11 वे सत्र आहे. आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने विधानसौधच्या सभागृहात लावलेल्या वीर दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राला आक्षेप घेऊन आंदोलन छेडले.

सरकारच्या बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या आज पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या आणि इतर काँग्रेस आमदारांनी विधानसौधच्या सभागृहात लावलेल्या स्वातंत्र्य वीर दामोदर सावरकर यांच्या तैलचित्राला आक्षेप घेऊन आंदोलन छेडले.

अधिवेशन कामकाजाच्या प्रारंभीच काँग्रेस नेत्यांनी आंदोलन छेडल्यामुळे सत्ताधारी पक्षाविरुद्धचे भ्रष्टाचाराचे आणि त्यांच्याकडून विकास कामांकडे झालेले दुर्लक्ष हे प्रमुख मुद्दे आज बाजूला पडले.Session protest

अधिवेशनापूर्वीच सुवर्णसौध पायरीवर विरोधकांचा गदारोळ

उत्तर कर्नाटक विकासाच्या मुद्द्यावर बोलावण्यात आलेल्या बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाचा आज प्रारंभ होत झाला.दरम्यान या अधिवेशनापूर्वीच विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षाला सावरकरांच्या प्रतिमेवरून लक्ष बनवले आहे. अधिवेशन सुरुवात होण्याला काही वेळ बाकी असतानाच काँग्रेसच्या आमदारांनी सुवर्णसौधच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या आंदोलन करून सरकारच्या विरोधात आपला आक्रोश व्यक्त केला आहे.

केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, विधानसभा विरोधी पक्ष नेते सिद्ध रामय्या  यांनी विधान सभेतमहर्षि वाल्मीकि, बसवन्ना, संत शिशनाला शरीफा, कनकदास, नारायणगुरु, अंबेडकर, नेहरू, जगजीवन राम, सरदार वल्लभभाई पटेल, कुवेम्पु यांचे तैलचित्र लावण्याची मागणी केली.सलीम अहमद, सतीश  जारकी होळी,  एचके पाटिल, केजे जॉर्ज, आर वी देशपांडे, आदींनी आंदोलन केलं

दुसरीकडे बेळगाव पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा आयोजित करण्यास परवानगी नाकारली. तसेच टिळकवाडी पोलीस स्थानक व्याप्तीत प्रतिबंधात्मक आदेश बजावला. कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोक कुमार यांनी मेळाव्याच्या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळाव्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही आणि महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना बेळगाव प्रवेश बंदी करण्यात आली असल्याची माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.