Tuesday, April 23, 2024

/

ठेवलेल्या पाईपला लागली आग…

 belgaum

बेळगाव शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पाचे काम सुरू असताना कणबर्गी येथे बसवण्यासाठी आणलेल्या पाईपला चुकून आग लागली आणि पाईप जळून खाक झाले आहेत.

बेळगाव येथील ज्योतिर्लिंग गल्ली, कणबर्गीजवळ पहाटे तीन वाजता ही घटना घडली होती.या घटनेत तीसहून अधिक पीयूसी पाईप आगीत भस्म झाले आहेत.Burnt

एल अँड टी कंपनीने कणबर्गी येथे कामासाठी पाईप्सचा साठा केला होता.पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास चुकून आग लागली व पाईपने पेट घेतला.

 belgaum

अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली.कोणतीही मोठी घटना घडली नाही. आजूबाजूला घरे नसल्याने हा अपघात टळला पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.