महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेळगाव दौऱ्यावरच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकाचे मुख्यमंत्री मोठे वक्तव्य केलं असून कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावला पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.
रामदुर्ग तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी येथे आज शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
सध्या दोन्ही राज्यातील परिस्थिती लक्षात घेता चंद्रकांत दादांनी बेळगावला येऊ नये अशी विनंती कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी एका संदेशाद्वारे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाला केली असल्याचे सांगून यापूर्वी अनेकदा अशा पद्धतीचे प्रयत्न झाले असले तरी कर्नाटक सरकारने त्याविरुद्ध जे क्रम घेतले तेच क्रम यावेळीही घेतले जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राज्यांत तणावाची परिस्थिती असल्याने बेळगावला महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी जाणे योग्य नव्हे असा संदेश फॅक्स मार्फत कळवला गेला आहे अश्या पद्धतीचे प्रयत्न झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असेही कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांनी म्हंटले आहे.
या पार्श्वभूमीवर आता सुरुवातीला 3 डिसेंबर रोजी होणारा चंद्रकांत पाटील यांचा दौरा बेळगाव दौरा नुकताच पुढे ढकलून 6 डिसेंबर रोजी करण्यात आला आहे. मात्र आता कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना केलेली विनंती लक्षात घेता सीमाभाग समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांचा बेळगाव दौरा होणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.