मण्णूर येथील हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे गेली सहा वर्षे नित्यनियमाने दर रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा अर्चा सुरू आहे.
या पूजेला गावातील कार्यकर्ते आणि नागरिक त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा उपस्थित असतात. लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांची माहिती मिळावी या उद्देशाने संघटनेतर्फे प्रतिवर्षी महाराष्ट्र मधील अनेक गडकिल्ल्यांना भेट देऊन गडकिल्ल्यांची माहीती घेतली जाते. ही मोहीम प्रतिवर्षी राबविण्यात येते.
मात्र गावातील लहान मुलांना आपल्या जवळच्या राजहंसगडाची माहिती असणे गरजेचे आहे हा उद्देश समोर ठेवून संघटनेमार्फत ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये जवळपास २०० जण सहभागी झाले होते. यामध्ये, १७० लहान मुले सहभागी झाली होती.
लहान मुलांच्या मनावर छत्रपती शिवरायांचे आचार विचार रुजवणे तसेच आपल्या देशाबद्दल आणि आपल्या आई-वडिलांबद्दल प्रेम आणि आदराची भावना निर्माण करणे व युवकांना व्यसनांपासून दूर ठेवणे हा उद्देश ठेवून समाजासाठी कार्य करणे हेच संघटनेचा मुख्य काम आहे.
यावेळी लहान मुलांनी रांजहंसगडाची पाहणी करुन गडकिल्ल्यांची माहीती देण्यात आली. संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि पालक मोहीममध्ये सहभागी झाले होते.