belgaum

उत्तर प्रदेशातील तरुणाची बेळगावात आत्महत्या

0
Police logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील प्रसिद्ध कपिलेश्वर मंदिर परिसरात एका तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक वादाला कंटाळून या तरुणाने आपले जीवन संपवले असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अवधूत प्रशांत तुडवेकर आणि त्यांच्या मित्रांनी २८ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास कपिलेश्वर मंदिराच्या विहिरीत एका तरुणाला उडी मारताना पाहिले. त्यांनी तातडीने धाव घेत त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढले. विचारपूस केली असता, घरगुती वादातून आत्महत्या करण्यासाठी विहिरीत उडी मारल्याचे त्या तरुणाने सांगितले. त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तपासणी दरम्यान या तरुणाच्या खिशात त्याचे आधार कार्ड सापडले. त्यावरून त्याची ओळख पटली असून, छोटू शंकर राजभर (रा. देवरिया, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. दुर्दैवाने, उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली. २८ जानेवारीपासून त्याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे.

 belgaum

खडेबाजार पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून मृताच्या वारसांचा शोध घेण्यासाठी वृत्तपत्रांतून माहिती प्रसिद्ध केली आहे. मात्र, अद्याप मृत छोटू राजभर याच्या नातेवाईकांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. अवधूत तुडवेकर यांनी याप्रकरणी खडेबाजार पोलीस ठाण्यात सविस्तर माहिती दिली असून पोलीस पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.