Thursday, December 26, 2024

/

दिवंगत ॲड. राम आपटे यांची 27 रोजी शोकसभा

 belgaum

बेळगाव परिसरातील सर्व शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि सर्व राजकीय पक्ष यांच्यातर्फे येत्या मंगळवार दि. 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे लढवय्ये नेते, नामवंत वकील, समाजवादी कार्यकर्ते व बेळगाव शाखा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष दिवंगत ॲड. राम आपटे यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील मराठी विद्यानिकेतन ज्योती कॉलेज कंपाउंड कॅम्प बेळगावच्या प्रांगणात ॲड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही शोकसभा होणार आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व नामवंत वकील ॲड. राम आपटे यांचे गेल्या शुक्रवारी 23 डिसेंबर रोजी पहाटे वयाच्या 97 व्या वर्षी चन्नम्मानगर येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या स्वरूपात सीमा चळवळीतील एक अग्रणी सच्चा लढवय्या कार्यकर्ता हरपला आहे. सीमाप्रश्नाबरोबर ॲड. राम आपटे हे नेहमीच कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अखंड लढत राहिले. ज्यामुळे ते लढवय्ये कामगार नेते म्हणून परिचित होते. ॲड. राम आपटे यांनी जीवन विवेक प्रतिष्ठान या सामाजिक विश्वस्त संस्थेची स्थापना केली.

अन्याय निवारण मंच, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, शोषणमुक्ती दल अशा बेळगाव येथील सामाजिक संस्थांचे ते संस्थापक व आधारस्तंभ होते. तरी त्यांच्या शोकसभेला बेळगाव परिसरातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मराठी विद्यानिकेतन शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.