Tuesday, December 24, 2024

/

जिल्ह्याला उपलब्ध होणार 10 नव्या रुग्णवाहिका

 belgaum

रुग्णवाहिका सेवेला अधिक बळकटी देण्याच्या अनुषंगाने सरकारतर्फे रुग्णवाहिकांची खरेदी केली जाणार असून त्यात बेळगाव जिल्ह्यासाठी सुमारे 10 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

सरकारकडून अलीकडे 262 नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यास परवानगी मिळाली आहे. तसेच इतर उपकरणांच्या खरेदीसाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका लवकर उपलब्ध होणार आहेत.

राज्यासाठी 262 रुग्णवाहिका असला तरी सर्वाधिक म्हणजे सुमारे 10 रुग्णवाहिका बेळगावला उपलब्ध होणार आहेत. या रुग्णवाहिकांसह लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांचे जीव वाचवणे व वेळेत वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे शक्य होणार आहे.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत जिल्ह्यात आणखी किती रुग्णवाहिकांची गरज भासणार? याची माहिती घेण्यात आली. त्यानंतर शासनाकडे रुग्णवाहिकेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

बेळगावसह राज्यामधील अन्य जिल्ह्यांचा आढावा घेऊन रुग्णवाहिका खरेदी केल्या जात असून रुग्णवाहिका खरेदीसाठी निधीची तरतूद केल्यामुळे लवकरच रुग्णवाहिका वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील जनतेला 15 ते 20 मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.