विरोधक सक्षम शक्तिशाली असला की गुन्हा दाखल करणे हे तंत्र भाजपने अवलंबले असल्याची टीका कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष डी के शिवकुमार यांनी केली आहे.बेळगाव विमान तळावर विनय कुलकर्णी यांच्या जन्मदिना निमित्त ते आले असता पत्रकारांशी ते बोलत होते.
जो कोणी विरोधक सक्षम दिसतो बळकट दिसतो राजकीय रित्या पुढे येतो त्याना त्रास द्यायचा त्याच्यावर केस घालायचं काम या भाजपवाल्यांनी केलेलं आहे.जाणून बुजून विनय कुलकर्णी यांना तो अडकवण्याचा प्रयत्न होता राजकीय उद्देश समोर ठेवून त्यांना खुनाच्या प्रकरणी गोवले होते.भाजपने डी के शिवकुमार,सोनिया गांधी राहुल गांधी यांना गुन्हेगार ठरवलं आहे असा टोलाही त्यांनी लगावला.
कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते हे वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे करत असतात. कोणत्याही नेत्यांना त्या मतदारसंघात केलेली काम त्यांना केलेली मदत याची जाणीव म्हणून कार्यकर्ते हे वाढदिवसाचे आयोजन सत्काराचे कार्यक्रम ठेवत असतात त्यासाठीच्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे.
वाढदिवस साजरी करण्याची प्रत्येकाची वेगळी पद्धत असते काही जन देव दर्शन घेतात काही इस्पितळात रुग्णांना मदत करतात तर आपापल्या पद्धतीने अश्या कार्यक्रमाचे नियोजन करतात असे त्यांनी नमूद केलं.
धारवाड मध्ये कार्यक्रम करण्यास विनय कुलकर्णी यांना काँग्रेसने निर्बंध घातले आहेत यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी वाढदिवस साजरा करत आहेत कुलकर्णी यांना राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे त्यामुळे बेळगावात कार्य करत आहेत असाही निर्वाळा शिवकुमार यांनी दिला.
पोलिसांनी विनय कुलकर्णीवर बी अहवाल सादर केला आहे. राजकीय हेतूने भाजपने प्रभाव पाडून सदर केस सीबीआयकडे सोपवलीआहे. सीबीआय कशी काम करते हे मला सांगण्याची गरज नाही. विनयला धारवाडला बंदी घालण्याच्या न्यायालयाच्या अधिकारावर मी प्रश्न विचारत नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं.
डी के शी ऊर्जामंत्री असताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे त्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे मी स्वागत करतो. मी कधीच डोळे मिटून बसलो नाही. भाजपच्या राजवटीत ऊर्जामंत्री, जलसंपदा मंत्री यांनी कंत्राटे दिली आहेत. त्यांनी शेकडो कोटींची कंत्राटे दिलीत बेळगाव जिल्ह्यातही याची अनेक उदाहरणे आहेत. मी डोळे मिटून राजकारण करत नाही असेही त्यांनी पुढे नमूद केलं.विमान तळावर माजी मंत्री एम बी पाटील यांच्या सह जिल्ह्यातील आजी माजी आमदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.