Tuesday, April 30, 2024

/

दोनशे शेतकऱ्यांनी नोंदवले आक्षेप

 belgaum

तालुक्याच्या चारी बाजू जाणाऱ्या जवळपास 1300 एकर जमीन संपादित करणाऱ्या रिंग रोडला 823 हून अधिक शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर आता बेळगाव धारवाड रेल्वे लाईन च्या जमीन संपादनाला देखील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध करत बेळगाव तालुक्यातील देसुर, नंदीहळी केकेकोप सह खानापूर व तालुक्यातील गर्लगुंजी येथील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवला.धारवाड येथील के आयडीबीच्या विशेष जमीन अधिग्रहण अधिकाऱ्यांना वैयक्तिक आक्षेप नोंदवले.

या अगोदर या शेतकऱ्यांनी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या निवासस्थाना समोर धरणे आंदोलन केलं होते या शिवाय प्रांताधिकारी जिल्हाधकाऱ्यांमार्फत निवेदन देत विरोध केला होता मात्र अद्याप या शेतकऱ्यांना आश्वासन मिळाले आहे.

 belgaum

बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या भागातील शेतकऱ्यांना जमीन संपादन करण्यासाठी नोटिशी बजावण्यात आल्या आहेत त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे या रेल्वे मार्गासाठी पर्यायी रेल्वे मार्गाचा विचार करावा या जमीन संपादित करू नये असा आक्षेप शेतकऱ्यांनी नोंदवला आहे.पर्यायी मार्गाचा अवलंब केल्यास चार की.मी.अंतर कमी होणार आहे याशिवाय खर्चही कमी होणार आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून देखील जुन्या मार्गासाठी जमीन संपादनाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.Farmers objections

पर्यायी रेल्वे मार्गामुळे प्रभुनगर, नंदीहल्ली आणि गर्लगुंजी आदी भागातील सुपीक जमिनी वाचणार आहेतअशीही भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे.

प्रस्तावित रेल्वे मार्ग
बेळगाव देसुर कित्तूर धारवाड
एकूण रेल्वे मार्गाची लांबी- 73.2की. मी .
रेल्वे स्थानकांची संख्या -7
रेल्वे पुलांची संख्या -140
होणारे भूसंपादन -335हेक्टर

आवश्यक निधी-927.40कोटी

 belgaum
Previous article
Next article
मधमाश्यांच्या हल्ल्यात वृद्ध महिला जखमी *मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे. सुगी निमित्त येळ्ळूर शिवारात भातकापणीचा जोर असल्याने सोमवारी आपल्याच शेतात भातकापणीला आलेल्या चांगूणा कृष्णा कुगजी वय 70 यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांनी दंश केल्याने त्या जखमी झाल्या आहेत. चांगुणा यांच्या सह या घटनेत इतर दोन महिलानांही मध माश्यांच्या झुंडीने चावा घेतला मात्र त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. शेतकरी नेते राजू मरवे आपल्या शेतात काम करायला गेले होते त्यावेळी बाजूच्या शेतातील घटना पाहून अग्नी पेटवून धूर करुन मधमाशांना हुसकावून लावले व जखमी महिलेच्या तोंडावरील व अंगावरील सर्व काटे काढूण टाकले. माश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या घरच्याशी संपर्क साधून येळ्ळूर रोड के एल ई इस्पितळात उपचारास घेऊन जाण्याचे मार्गदर्शन केले. मर्वे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार चांगणा यांचे माश्यांच्या दंशाने तोंड,ओठ मोठ्या प्रमाणात सुजले असल्याने त्यांना चालता येत नव्हते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सावकाश त्यांना येळ्ळूर रोडपर्यंत नेऊन नंतर के एल ई इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. शेतकऱ्यांनी शेतात काम करताना मध माश्यांच्या टोळीने हल्ला केल्यास शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.