बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी मंजुरी मिळालेल्या दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्रांपैकी एक असलेल्या मेसर्स रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमीचे हँगर व अप्रोन अंतिम सुरक्षा मान्यतेसाठी (सिक्युरिटी अप्रुव्हल) सज्ज झाले आहे.
मेसर्स समवर्धने टेक्नॉलॉजीस प्रा. लि. बेंगळूरचे बेळगाव विमानतळावरील दुसरे वैमानिक प्रशिक्षण केंद्र देखील आकार घेत आहे.
2/2)@RedBirdAviation is almost ready for Final Security Approval. #AirportDirector & other team members suggested few more points to VP(Operations):RedBird & Contractor.
Other Hangar work is also in progress.@AAI_Official @MoCA_GoI @AAIRHQSR @BcasHq @DGCAIndia pic.twitter.com/0e5ogofpNe— Belagavi Airport ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ (@aaiblgairport) November 5, 2022
विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी आज शनिवारी सिव्हिल, इलेक्ट्रिकल, फायर आदी विभागांचे प्रमुख आणि सुरक्षा व्यवस्थापकासमवेत रेड बर्ड फ्लाईंग ट्रेनिंग अकॅडमीच्या काम पूर्ण झालेल्या हँगर व अप्रोनच पाहणी केली.
पाहणीअंती त्यांनी उपस्थित तज्ञांना आवश्यक सूचना केल्या. आता हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरक्षा मान्यता मिळताच कार्यान्वित होणार आहे.
1/2)@RedBirdAviation is almost ready for Final Security Approval. #AirportDirector visited Hangar&Apron with Civil,Electrical,Fire incharges & Safety Manager. VP(Operations):RedBird & Contractor were also present during visit.@AAI_Official @MoCA_GoI @AAIRHQSR @BcasHq @DGCAIndia pic.twitter.com/VfzcK3MBun
— Belagavi Airport ಬೆಳಗಾವಿ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ (@aaiblgairport) November 5, 2022