बेळगाव मध्यवर्तीय बस स्थानकाच्या आवारातील शहर आणि उपनगरांच्या बसेससाठी असलेल्या तात्पुरत्या शहर बस स्थानकाचे (सीबीएस) स्वरूप बदलण्यात आले असून ते आता धूळ आणि खड्डे मुक्त झाले आहे.
धूळ माती आणि खड्डे हटविण्यासाठी वायव्य कर्नाटक रस्ते परिवहन निगमने (एनडब्ल्यूकेआरटीसी) मध्यवर्ती बस स्थानक आवारातील तात्पुरत्या सीबीएस बस स्थानकाच्या संपूर्ण जमिनीचे काँक्रिटीकरण केले आहे.
त्याचप्रमाणे बस स्थानकावरील फलाटांचे देखील नूतनीकरण करण्यात आल्यामुळे प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानक आवारातील सुमारे 10 हजार चौरस मीटर जमिनीचे काँक्रिटीकरण करून आवाराला धुळ व खड्डे मुक्त करण्यात आले आहे.
सध्या मध्यवर्तीय बस स्थानकाचे (सीबीटी) बांधकाम देखील सुरू आहे. त्यामुळे मागील 2020 सालापासून शहरी बसेसची सेवा सीबीएस येथून सुरू आहे.
एकदा का मध्यवर्ती बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण झाले की पुन्हा ही बस सेवा त्या ठिकाणी सुरू केले जाणार असून तात्पुरते सीबीएस बस स्थानक फक्त प्रवाशांना उतरण्यासाठी वापरले जाणार आहे.