Tuesday, May 7, 2024

/

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जाहीर आवाहन !

 belgaum

बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 28 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित शेतकऱ्यांच्या चाबूक मोर्चाला मध्यवर्ती म. ए. समितीने संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला असून समस्त बेळगावकरांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

रिंगरोडच्या नावाखाली 32 गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत आहे.या जमिनी वाचविण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने कंबर कसून जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांना या मदत करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने मोर्चात सहभागी होणे गरजेचे आहे.

बेळगाव शहर व तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक महिला, युवक मंडळे आदींनी सोमवार 28 रोजीच्या सकाळी 10:30 वाजता तालुका म. ए. समितीने आयोजित केलेल्या मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी व्हावे,

 belgaum

असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचेअध्यक्ष दीपक दळवी, कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, चिटणीस रणजित चव्हाण-पाटील आणि पदाधिकारी यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.