Sunday, April 28, 2024

/

जमीन संपादन विरोधी हरकत नोंदवण्यासाठी वाढीव मुदत

 belgaum

रिंग रोड जमीन संपादनात हरकत दाखल करण्यासाठी वाढीव मुदत देण्यात आली आहे. बेळगाव शहराच्या सभोवतालीखालील सुपीक जमीन संपादन करण्याचा घाट शासनाच्या वतीने घालण्यात आला आहे त्यासाठी हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे.

तालुका महाराष्ट्र विधान समितीच्या वतीने शेकडो शेतकऱ्यांनी या जमीन संपादनास हरकत नोंदवली आहे या भू संपादना विरोधात आक्षेप नोंदवण्यासाठी 31 ऑक्टोबर अंतिम तारीख होती मात्र प्रशासनाने हा अवधी वाढवून चार नोव्हेंबरपर्यंत केलाआहे.

वाढीव अवधी मिळाल्याने आता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तक्रार नोंदवता येणार आहे तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात वकील सुधीर चव्हाण वकील एम जी पाटील वकील श्याम पाटील यांच्या माध्यमातून हरकती नोंदवत तक्रार दाखल करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

 belgaum

गुरुवारी ही तालुका समितीची बैठक झाली रिंग रोड भू संपादन विरोधात एल्गार करण्याबाबत आणखी शक्तीने लढा देण्याचे ठरविण्यात आले. गुरुवारच्या बैठकीमध्ये देखील पुन्हा एकदा ज्या कुणी शेतकऱ्यांनी हरकत दाखल केली नाही त्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी कॉलेज रोड येथील तालुका समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.Mes against land aquisition

बेळगाव शहराच्या सभोवताली असलेल्या हजारो एकर शेकडो जमिनी विविध योजना प्रकल्पामधून संपादन करण्याचा घाट प्रशासन घालत आहे या विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. हलगा मच्छे बायपास बेळगाव धारवाड नवीन रेल्वे लाईन आणि बुडाच्या माध्यमातून सुरू असलेले भूसंपादन या विरोधातही शेतकरी आक्रमक झाले आहेत.

आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आणि भूसंपादना विरोधात भव्य मोर्चा काढण्याची देखील निर्मिती महाराष्ट्रकीकरण समितीच्या वतीने आपली जात आहे हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याला घेराव घालता येईल का याबाबत देखील चाचणी सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.