३० मार्च २०१८ रोजी बेळगावचे आघाडीचे वेब न्युज चॅनेल ‘बेळगाव लाईव्ह’ या न्युज चॅनलच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात दै. सामनाचे संपादक संजय राऊत, बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी आणि दै. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत टिळकवाडी पोलीस स्थानकातून समन्स बजाविण्यात आले आहे
बेळगाव लाईव्हच्या प्रथम वर्धापनदिनी महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि दै. सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ३० मार्च २०१८ रोजी झालेल्या कार्यक्रमात भाषिक तेढ निर्माण करणारे भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला.
आज तिघांना टिळकवाडी पोलीस स्थानकांतर्गत संजय राऊत यांच्यासह किरण ठाकूर आणि प्रकाश बेळगोजी यांना भा. दं. वि. कलम १५३ आणि ५०५ (२) नुसार गुन्हा नोंदवून समन्स बजाविण्यात आले आहेत.
याचप्रमाणे आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जेएमएफसी क्रमांक ४ या न्यायालयाने तिघांनाही नोटीस बजाविली असून डिसेम्बर महिन्यात न्यायमूर्ती मंजुनाथ बनकर यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे.
बेळगाव live च्या वतीने 2018 साली प्रथम वर्धापन आयोजित करण्यात आला आहोत त्या कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्या सह मॅक्स महाराष्ट्र चे संपादक रवींद्र आंबेकर देखील उपस्थित होते.