*मधमाशांच्या हल्ल्यात वृद्ध शेतकरी महिला जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली आहे.
सुगी निमित्त येळ्ळूर शिवारात भातकापणीचा जोर असल्याने सोमवारी आपल्याच शेतात भातकापणीला आलेल्या चांगुणा कृष्णा कुगजी वय 70 यांना मोठ्या प्रमाणात मधमाशांनी दंश केल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
चांगुणा यांच्या सह या घटनेत इतर दोन महिलानांही मध माश्यांच्या झुंडीने चावा घेतला मात्र त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. शेतकरी नेते राजू मरवे आपल्या शेतात काम करायला गेले होते त्यावेळी बाजूच्या शेतातील घटना पाहून अग्नी पेटवून धूर करुन मधमाशांना हुसकावून लावले व जखमी महिलेच्या तोंडावरील व अंगावरील सर्व काटे काढूण टाकले.
माशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेच्या घरच्याशी संपर्क साधून येळ्ळूर रोड के एल ई इस्पितळात उपचारास घेऊन जाण्याचे मार्गदर्शन केले.
मर्वे यांनी सांगितलेल्या माहितीनुसार चांगणा यांचे माश्यांच्या दंशाने तोंड,ओठ मोठ्या प्रमाणात सुजले असल्याने त्यांना चालता येत नव्हते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी सावकाश त्यांना येळ्ळूर रोडपर्यंत नेऊन नंतर के एल ई इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.
शेतकऱ्यांनी शेतात काम करताना मध माश्यांच्या टोळीने हल्ला केल्यास शेतकऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना उपचारासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी या निमित्ताने उपस्थित झाली आहे.