चिकोडी तालुक्यातील भोज गावातील श्री बीरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीत बनावट सोन्याला हालमार्क घालून खरे सोने असल्याचे सांगून 2 लाख 75 हजार रुपये कर्ज घेतल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात सदलगा पोलिसांना यश आले आहे.
भोज शाखेच्या बीरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक आनंद चिदानंद कमते ( रा.सदलगा) यांनी सदलगा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केले आहेत.
सदर प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांनी प्रमुख आरोपी कोल्हापूरचा अमूल गणपती पोतदार व राजस्थान जयपूर रहीवाशी पप्पू मदनलाल जांगडी यांना अटक केले.
आरोपी इंचलकरंजीचे ओमकार चंद्रकांत दबाडे, गणेश नेमिनाथ गोडके, चंदू गजाज बोरगे, गौसपाक अब्दुलरजाक जमादार, कोल्हापूरचे सुहास सतपा मोहिते, अथणीचे फरीद अब्दुल मकानदार यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास करीत आहेत.
<span;> या आरोपींनी बोरगाव जनता को ऑप क्रेडिट सोसायटी, मांगुरची श्री भैरवनाथ को ऑप क्रेडिट सोसायटी, हेब्बाळ अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी, कर्नाटक को ऑप क्रेडिट सोसायटी रायबाग, एचडीएफसी बँक चिकोडी, एमएजी फायनान्स चिकोडी, एक्सिस बँक बैलहोंगल, एक्सिस बँक निपाणी, आयसीआयसीआय बँक चिकोडी, भोज शाखा बीरेश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीत बनावट सोन्याला हालमार्क लावून खरे सोने असे सांगून कर्ज घेतल्याचे उघडकीस आले आहे.
आरोपींची कसून तपास केला जात असून, पुढील तपास सदलगा पोलिस करीत आहेत. पोलीसांच्या कार्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षकानी सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.