बेळगाव शहरातील रस्त्यावर असलेले खड्डे सुरू असलेली स्मार्ट सिटीची काम त्यामुळे रस्त्यावर रहदारीला येणारे अडथळे त्यामुळे छोटे मोठे अपघात कधी होतील याची शाश्वती नसते. गेल्या चार ते पाच वर्षापासून बेळगाव शहरात गाड्या चालवणाऱ्या वाहन चालकांना याचा अनुभव येतचं आहे.
बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांच्या विश्वेश्वरय्या नगर येथील बंगल्या समोरील वळण धोकादायक बनले असून सदर जागा अपघात झोन बनले आहे.
या वळणावर नेमकी वाहने अतिवेगाने येत असतात त्यामुळे लहान मोठे अपघात घडत आहेत.सोमवारी सकाळीही अपघात घडला असून मारुती कार गाडीला वळण न बसल्याने कारने ट्रकला धडक दिली सुदैवाने या गाडी चालवणाऱ्या 62वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जीव वाचला आहे.
मारुती कारला अपघात उगाच होताच कारच्या एअरबॅग उघडल्या त्यामुळे त्या वृद्धाचा जीव वाचला आहे.या अपघातात ट्रकचे फाटे देखील तुटले आहेत.
खासदार अंगडी यांच्या घरासमोरील धोकादायक वळणावर दिशादर्शक फलक बसवावा स्पीड ब्रेकर लावावा अशी मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.
खासदार अंगडी यांनी या धोकादायक वळणा कडे लक्ष देऊन सदर धोकादायक वळणावर स्पीड ब्रेकर बसवावा दिशादर्शक फलक लावावा अशी मागणी वाहन चालकाकडून होत आहे.