ईद-ए-मिलाद निमित्त उद्या रविवारी शहरातील मुस्लिम बांधवातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उद्या रविवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
पिंपळकट्टा, फोर्ट रोड देशपांडे पेट्रोल पंप येथून सदर शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. तथून मुजावर खूट, मध्यवर्ती बस स्थानक, आरटीओ सर्कल, जिल्हाधिकारी कार्यालय, कित्तूर चन्नम्मा चौक, कॉलेज रोड, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, खानापूर रोड कॅम्प फिश मार्केट मार्गे ग्लोब टॉकीज नजीकच्या असदखान दर्गा येथे ही शोभायात्रा समाप्त होणार आहे. सदर शोभायात्रा सुरळीत पार पडावी यासाठी उद्या रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीचा मार्ग पुढील प्रमाणे बदलण्यात आला आहे.
कोल्हापूर, संकेश्वर, चिक्कोडीकडून चन्नम्मा सर्कल मार्गे गोव्याकडे जाणाऱ्या सर्व वाहन चालक व प्रवाशांनी बॉक्साईट रोड मार्गे हिंडलगा फॉरेस्ट नाका, अरगन तलाव रोड, गांधी सर्कल, शौर्य चौक (मिलिटरी हॉस्पिटल सर्कल) केंद्रीय विद्यालय क्र. 2, शर्कत पार्क, गवळी गल्ली क्रॉस, सेंट पॉल हायस्कूल, मिलिटरी महादेव मंदिराच्या मागील बाजूने काँग्रेस रोड मार्गे खानापूर रोड वरून पुढे मार्गस्थ व्हावयाचे आहे.
गोवा, खानापूरकडून राष्ट्रीय महामार्गाकडे संकेश्वर, चिक्कोडी, कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहन चालक व प्रवाशांनी तिसरे रेल्वे गेट, काँग्रेस रोड, मिलिटरी महादेव मंदिराच्या मागील बाजूने सेंट पॉल हायस्कूल, शर्कत पार्क, केंद्रीय विद्यालय क्र. 2, शौर्य चौक, गांधी सर्कल, गणेश मंदिर हिंडलगा रस्त्यावरून डबल रोड आणि त्यापुढे बॉक्साइट रोड मार्गे राष्ट्रीय महामार्गावर मार्गस्थ व्हायचे आहे. गोवा खानापूरकडून गोकाक, यरगट्टी, धारवाडकडे जाणाऱ्या सर्व वाहन चालक व प्रवाशांनी तिसरे रेल्वे गेट, अनगोळ नाका, आरपीडी सर्कल, गोवावेस सर्कल,
महात्मा फुले रोड, शहापूर बँक ऑफ इंडिया नूतन रस्त्यावरून जुना पी. बी. रोड, येडीयुरप्पा मार्गाने अलारवाड ब्रिज नजीक राष्ट्रीय महामार्गावरून पुढे प्रस्थान करावे. गोकाक, यरगट्टी धारवाडकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनचालक व प्रवाशांनी अलारवाड ब्रिज नजीक जुना पी. बी. रोड, होसुर पिंपळकट्टा, बँक ऑफ इंडिया डबल रोड मार्गे गोवावेस सर्कल येथून खानापूर रोड मार्गे पुढे गोव्याच्या दिशेने मार्गस्थ व्हावयाचे आहे.