Monday, December 30, 2024

/

मागणी रस्ता दुरुस्तीची, मात्र तात्पुरती डागडुजी

 belgaum

जुना पी. बी. रोड येथील छत्रपती शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या पायथ्याशी पडलेल्या धोकादायक खड्ड्यांसंदर्भात बेळगाव लाईव्हसह सोशल मीडियावर आज जोरदार आवाज उठवण्यात येताच युद्धपातळीवर खड्डे बुजवून रस्त्याची तात्पुरती करण्यात आली.

जुना पी. बी. रोड येथील छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याच्या पायथ्याशी जिजामाता चौकाच्या बाजूला धोकादायक मोठे खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती. सदर खड्ड्यांकडे झालेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आसपासच्या नागरिकांनी गांधीगिरी करत रस्त्यावरील खड्ड्यामध्ये चक्क नारळाच्या झाडाचे वृक्षारोपण केले होते.

या संदर्भात बेळगाव लाईव्हसह सोशल मीडियावरील मराठी इंग्रजी, कन्नड अशा अनेक माध्यमांनी आज शुक्रवारी सकाळी सचित्र वृत्त प्रसिद्ध करून जोरदार आवाज उठविला होता. याची दखल घेत खडबडून जागा झालेल्या प्रशासनाने -महापालिकेने आज दुपारनंतर युद्ध पातळीवर छ. शिवाजी रेल्वे ओव्हर ब्रिजच्या रस्त्यावरील संबंधित खड्डे दगडमातीने तात्पुरती डागडुजी करून बुजविले आहेत.Road pathholes

डागडुजी करून सदर खड्डे तात्पुरते बुजवण्यात आले असले तरी सध्याचे पावसाळी हवामान पाहता ही डागडुजी प्रतिकूल ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जोराचा पाऊस झाल्यास खड्ड्यातील दगड माती उखडून रस्त्याची दुर्दशा होऊन तो अधिकच धोकादायक होणार आहे तेंव्हा याकडेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदर खड्डे व्यवस्थित बुजवून रस्ता कायमस्वरूपी चांगला राहील अशी दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.

 belgaum

1 COMMENT

  1. Congratulations
    Please cover Railway over bridge, khanapur road also
    there no street lights from so many months

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.