Friday, April 26, 2024

/

गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा सहावा पदवीदान समारंभ

 belgaum

कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचा सहावा पदवीदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.आंध्र प्रदेश येथील सेंट्रल युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रा.एस. व्ही.कोरे हे पदवीदान समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष अनंत मंडगी यांनी ऑनलाईन सहभाग घेतला होता. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रा.एस.विद्याशंकर,विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार प्रा.आनंद देशपांडे,संस्थेचे उपाध्यक्ष आर.बी.भंडारी, डी. व्ही.कुलकर्णी,प्रदीप सावकार,सचिव व्ही.जी.कुलकर्णी,एस.व्ही. गणाचारी,अशोक आयर्नचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक जयंत हुंबरवाडी यांची पदवीदान कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.

पदवीदान कार्यक्रमात ११२४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.५३ एम टेक,१०८ एम बी ए,११८ एम सी ए आणि २७९ पदव्युत्तर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली .
विद्यार्थ्यांच्या यशामध्ये कॉलेजचा महत्त्वाचा वाटा आहे.त्या बरोबरच कॉलेजचे प्राध्यापक वर्ग आणि पालक यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.शिक्षण पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांनी प्रगतीची नवी शिखरे सर करावीत.विद्यार्थ्यांनी शिक्षक वर्ग आणि पालक यांना विसरू नये असे विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलसचिव प्रा.आनंद देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना उदगार काढले.

 belgaum

Git
विद्यार्थ्यांना आजवर घेतलेल्या शिक्षणाचा करियर करताना उपयोग होणार आहे.उद्योग विश्वात नित्य नवे बदल होत आहेत. नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे.स्पर्धेत टिकायचे असेल तर सदैव सजग राहिले पाहिजे असे जयंत हुंबरवाडी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात म्हणाले.

व्यासपीठावर प्राचार्य जयंत कित्तूर,व्यवस्थापन मंडळाचे सदस्य राज बेळगावकर, प्रा. डी. ए.कुलकर्णी, प्रा.एम.एस.पाटील यांचीही उपस्थिती होती.पदवीदान कार्यक्रमाला विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.