Sunday, April 28, 2024

/

येळ्ळूरच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

 belgaum

येळ्ळूर हद्दीत येणाऱ्या सर्व शाळा जवळील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविणे व सिग्नल बोर्ड बसवा अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.शनिवारी बेळगांव जिल्हाधिकारी यांना येळ्ळूर ग्राम पंचायत सर्व शाळा प्रशासनच्या वतीने यासंबंधी निवेदन देण्यात आले.

येळ्ळूर वरून नंदीहळ्ळी ,देसुर, आणि गर्लगुंजी येथून येणारी विटा,वाळूची वाहने फार वेगाने ये जा करत असतात.यामुळे मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे यापूर्वीही याबाबतीत सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंत्यांना निवेदन दिले होते मात्र याबाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही असे जिल्हाधिकारी यांना निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने ग्राम पंचायत व हायस्कूल,प्रायमरी,अंगणवाडी या सर्वांच्या वतीने मा.अप्पर जिल्हाधिकारी अशोक धुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले.
येळ्ळूरच्या मुख्य रस्त्यावरुन सकाळी 8.00 ते10:30 वाजेपर्यंत व सायंकाळी 4:00 ते 5:30 वाजेपर्यंत अवजड वाहने प्रवेश बंद करावा किंवा अवजड वाहने अन्य मार्गाने वळवावीत असेही निवेदनात म्हटले आहे.Yellur gp

 belgaum

यावेळी,ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा पाटील, ग्राम पंचायत सदस्य प्रमोद पाटील,शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे,परशराम परीट,राकेश परीट,जोतिबा चौगुले,दयानंद उघाडे,कल्लाप्पा मेलगे,शशीकांत धुळजी,अरविंद पाटील,राजू डोंन्यानावर, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक ,मुख्याध्यापक पी बी कांनशीडे,जे पी धामनेकर, सौ के बी पोटे,सौ लता बस्तवाडकर,

मुख्याध्यापक एम बी बाचीकर, एस बी मजूकर, हेमंत लोकळूचे, प्रशांत सुतार,नारायण पाटील,सौ कंनुकले,सौ हुर्दनमठ, मुख्याध्यापक एस आर निलजकार,के डी पाटील,एस आर आरेर, एम एल हांडे,एम एस मांडोळकर,एस एस बाळेकुंदरी, एस बी दोरगुडे,एस पी पाखरे,एस पी पाटील,एस वाय मेनसे,एम वाय कडलीकर, हेमवती आय बी ,रेणुका अलनावर, श्रुष्टी सुप्पनवर, सौ अश्विनी कडबी,रेश्मा एस अनगोळ आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.