Saturday, April 20, 2024

/

ऑटो स्पेअर पार्ट दुकानाला आग; लाखोचे नुकसान

 belgaum

महाद्वार रोड तेथील कॅनरा बँक समोरील झेन ऑटोमोबाईल्स या ऑटो स्पेअर पार्ट दुकानाच्या गोदामाला आज सोमवारी दुपारी आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

स्पेअर पार्ट दुकानाच्या गोदामाला दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लागलेल्या या आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा कयास व्यक्त केला जात आहे. झेन ऑटोमोबाईल्स हे महाद्वार रोड परिसरातील स्पेअर पार्टचे मोठे दुकान आहे.

या दुकाना लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाचे तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासाच्या महत्प्रयासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले.

मात्र तोपर्यंत दुकानातील लाखो रुपयांचे स्पेअर पार्ट वगैरे सामान आगीत भस्मसात झाले होते.सोमवारी सकाळी दिवाळी निमित्त दिवा लावण्यासाठी गोदाम सुरू करण्यात आले होते.

त्या नंतर काही वेळात आग लागून ऑटो महागडे पार्ट आगीत जळून खाक झाले असून लाखोंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.