छ.शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील स्पर्धा-परीक्षा काळ,प्रवेश प्रक्रियेची रुपरेषा आणि सिमाभागातील विद्यार्थ्यांच्या पदवीपूर्व च्या अंतीम परिक्षा या बाबींना धरून प्रवेश प्रक्रियेसंबंधीत येणारी समस्या विचारात घेत मध्यवर्ती समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.
या विषयावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकारिणीशी चर्चा करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया अधिक सोईस्कर करण्यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सिमाभागातील 865 गावांतील नोंदणीकृत विद्यार्थांनी
दि.16-10-2022 च्या आत त्या त्या भागातील घटक समितीकडे अभ्यासक्रम,संपर्क क्रमांकासहीत आपली नावे द्यावीत असे समितीचे युवा कार्यकर्ते महांतेश कोळुचे यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन केले आहे.
अडमिशन संदर्भात अधिक माहितीसाठी महंतेश कोळूचे +91 91132 23313 यांच्याशी संपर्क करा असे कळवण्यात आले आहे.