Wednesday, May 1, 2024

/

उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हाचे पिरनवाडीत स्वागत!

 belgaum

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने दिलेल्या पक्षाच्या नवीन नावाचे आणि चिन्हाचे बेळगावात देखील जल्लोषी स्वागत झाले.बेळगाव सीमा लढ्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी होते तेच चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळाल्याचा आनंद यावेळी व्यक्त करण्यात आला.

उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यामुळे ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष सुरू आहे केवळ एकच दिवसांत सोशल मीडियाच्या माध्यमातून मशाल चिन्ह महाराष्ट्रात घरोघरी पोहोचले आहे तोच उत्साह बेळगाव सह सिमाभागात पाहायला मिळत आहे.

पिरनवाडी येथे तालुका प्रमुख सचिन गोरले, तालुका उप प्रमुख पिराजी शिंदे, महाराष्ट्र एकीकरण समितिचे नारायण मूचंडीकर , गणेश आपटेकर, राजू वैजनाथ मूचंडिकर, रामनाथ मूचंडिकर, गजानन काकतीकर, प्रथमेश शिंदे व कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला.

 belgaum

मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी पिरनवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला आणि मशालला पुष्पहार घालून शिवसेच्या जयघोषाच्या घोषणा देऊन हा जल्लोष साजरा करण्यात आला. मशाल ही संयुक्त महाराष्ट्र ची निशांनी त्यामुळे हे चिन्ह मिळाल्याने समाधान यावेळी व्यक्तकरण्यात आले

बेळगाव शिवसेना तालुका प्रमुख सचिन गोरले म्हणाले ‘ शिवसेनेला पूर्वी नोंदणीकृत चिन्ह नव्हते मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अखंड महाराष्ट्र निर्मितीला मशाल प्रेरीत करून अखंड महाराष्ट्र निर्माण करण्याची दिशा दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगान उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आणि मशाल चिन्ह देण्यात आलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचं प्रतीक हे हाती मशाल धरलेलला कामगार आणि शेतकरी असं आहे. उद्धव ठाकरेंना मशाल चिन्ह मिळाल्यानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवं चिन्ह पोहोचवण्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेला १९८९ मध्ये धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यापूर्वी शिवसेनेच्या उमेदवारांची नोंद अपक्ष म्हणून व्हायची. १९८५ साली छगन भुजबळ हे मशाल चिन्हावर विधानसभेत विजयी झाले होते. तर, औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील सेनेचा पहिला खासदार देखील मशाल चिन्हावर निवडून आला होता. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदार संघात शिवसेना पुरस्कृत मोरेश्वर सावे मशाल चिन्हावर खासदार झाले होते. त्यामुळे या नवीन चिन्हाने उद्धव ठाकरे यांना शिवसेनेला नक्कीच बळ मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.