Thursday, May 23, 2024

/

वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारणीच्या कामाची खासदारांकडून पाहणी

 belgaum

बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी दोन वैमानिक प्रशिक्षण केंद्र स्थापण्यात येणार असून ही केंद्रं उभारणीच्या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी बेळगावच्या खासदार मंगल अंगडी यांनी आज शुक्रवारी सांबरा येथील बेळगाव विमानतळाला भेट दिली.

सदर वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या (एफटीओ) ठिकाणी व्यावसायिक वैमानिक परवाना मिळवू इच्छिणाऱ्या युवकांना 6 महिन्याचे वैमानिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांचे स्वप्न असलेला हा प्रकल्प लवकरच येत्या नोव्हेंबर 22 पूर्वी कार्यान्वित होणार आहे.

आज सांबरा येथील बेळगाव विमानतळ आवारातील सदर वैमानिक प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी भेट देणाऱ्या खासदार मंगल अंगडी यांनी केंद्र उभारणीच्या कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.Pilot training organisation

 belgaum

त्याचप्रमाणे उपस्थित विविध खाजगी एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांशी सकाळची बेंगळूर विमान सेवा सुरू करण्याबाबत चर्चा केली. त्यावेळी इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी या सप्टेंबर 2022 अखेर सकाळची बेंगलोर विमान सेवा सुरू होईल असे स्पष्ट केले.

यावेळी विमानतळाच्या विकासासंदर्भातील अनेक मुद्द्यांवर खासदार अंगडी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची चर्चा करून आवश्यक सूचना केल्या. खासदारांच्या भेटी प्रसंगी बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य आणि त्यांचे संबंधित सहकारी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी खासदार मंगला अंगडी यांनी बेळगाव विमानतळाहून अन्य नवीन शहरांना विमान सेवा सुरु करण्या संदर्भात, या शिवाय एफ टी ओ आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम कार्यप्रणाली अंमलबजावणी आणि पावसाळयातसांबरा बसरीकट्टी जवळील भिंत कोसळल्या काम करण्या बाबत बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी विमानतळ संचालक राजेश कुमार मौर्य यांनी बेळगाव विमान तळावरून प्रवास करणाऱ्या वाढत्या प्रवाश्यांचा आलेख बाबत विस्तृतपणे माहिती देत विमान तळावर सुरु असलेल्या विस्तृत कामाबाबत माहिती दिली. यावेळी बेळगाव हुन बंगळुरूला दररोज सकाळी विमानसेवा सुरु करण्याबाबत प्रयत्न करून बेळगाव हुन मैसुरु ,वाराणशी ,चेन्नई विमान सेवा सुरु करण्याबाबत चर्चा केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.