Sunday, September 1, 2024

/

कर्नाटकातील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधानांचे मौन का? : भास्करराव

 belgaum

बेळगाव : राज्यातील भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचारावर जगत आहे. काँग्रेस निजद आमदारांचे व्हिडिओ काढून त्यांना ब्लॅकमेल करत हा पक्ष पुढे आला आहे. लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकातील भ्रष्टाचाराकडे का लक्ष देत नाहीत? त्याबाबतीत ते का मौन पाळून आहेत? असा सवाल आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष भास्कर राव यांनी उपस्थित केला आहे.

बेळगाव शहरातील कन्नड साहित्य भवन येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चार महिन्यापूर्वी कर्नाटकातील सरकार ४० टक्के कमिशनवर होते आता ते सरकार ५० टक्के कमिशनचे झाले असून याप्रकरणी पंतप्रधानांना पत्र लिहून देखील काही उपयोग झालेला नाही.

आता येथील शिक्षण क्षेत्रातही भ्रष्टाचार बोकाळाला आहे. येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतानाही पंतप्रधान अद्याप का मौन बाळगून आहेत? भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई का करत नाहीत? राज्यातील भाजप सरकार ४० टक्के नव्हे तर ५० टक्के भ्रष्ट आहे, असा राज्यातील कंत्राटदारांचाही आरोप आहे, असे भास्कर राव म्हणाले.Bhaskar rao

पीएसआय नेमणुकीमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे हजारो परीक्षार्थींचे भविष्य विस्कटले आहे. कोरोना संदर्भात आरोग्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप आला आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असे सांगून मंगळूर येथे येणारे पंतप्रधान कर्नाटकातील भ्रष्टाचाराबद्दल काय बोलतात हे पहावे लागेल असेही भास्कर राव म्हणाले.

या पत्रकार परिषदेस राजकुमार टोपाण्णावर यांच्यासह आम आदमी पार्टीचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.