Thursday, May 23, 2024

/

यमकनमर्डी नहीं, तो सौंदत्ती सही! : सतीश जारकीहोळी

 belgaum

२०२३ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ८ ते ९ महिन्याच्या कालावधीवर येऊन ठेपलेली आगामी विधानसभा निवडणूक हि नेहमीपेक्षा चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बेळगावच्या राजकारणातील काँग्रेसचे किंगमेकर म्हणून मानले जाणारे आमदार सतीश जारकीहोळी यांचे बेळगाव मतदार संघावर प्राबल्य आहे. बेळगावच्या राजकारणात काँग्रेस पक्ष संघटनेत आमदार सतीश जारकीहोळी यांचे मोठे योगदान आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपने त्यांना टार्गेट करण्यास सुरुवात केली असून सतीश जारकीहोळी यांचा बालेकिल्ला असणाऱ्या यमकनमर्डी मतदार संघात उमेश कत्ती यांना प्रभारी बनवले गेले आहे. तर दुसरीकडे सतीश जारकीहोळी यांनीदेखील आतापासूनच ‘टाईट फिल्डिंग’ लावली असून यमकनमर्डी नही ती सौंदत्ती सही! असा पवित्रा घेतला आहे.

केवळ यमकनमर्डीचं नाही तर सौंदत्ती येथूनही निवडणूक लढवावी अशी जारकीहोळी समर्थकांची मागणी आहे. मात्र दोन्ही बाजूला निवडणूक लढविण्याची गरज नसल्याचे सतीश जारकीहोळी यांचे म्हणणे आहे.

 belgaum

गोकाकमध्ये प्रसारमाध्यमांना माहिती देताना आमदार सतीश जारकीहोळी यांनी नुकतीच हि प्रतिक्रिया दिली असून यमकनमर्डी मतदार संघ वगळता आपण सौंदत्तीमधूनंही निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत १० ते १२ जागांवर काँग्रेस उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय सर्व पक्षांचे उमेदवार जोवर जाहीर होत नाहीत तोवर काँग्रेस उमेदवारी जाहीर करणार नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड हि मोठी जिकिरीची बाब असते. विरोधी पक्ष जे तुल्यबळ उमेदवार जाहीर करेल यावरच खरी निवडणुकीची रणनीती आखली जाते. सतीश जारकीहोळी यांच्या विशिष्ट राजकारणाच्या शैलीमुळे त्यांचा एक वेगळा असा ठसा आहे.Satish jarkiholi

याच दृष्टिकोनातून बेळगाव दक्षिण मतदार संघातूनही त्यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी समर्थकांकडून मध्यंतरीच्या काळात करण्यात आली होती. दरम्यान याचकाळात आमदार जारकीहोळी यांनी उमेदवार निश्चित होईपर्यंत आपण दक्षिणेत काम करणार असल्याचेही जाहीर केले होते. यमकनमर्डी मतदार संघात उमेश कत्ती यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी भाजपने सुरु केली असून या धर्तीवर सतीश जारकीहोळी यांनी आपल्या दृष्टिकोनातून मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

मागील लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असलेले सतीश जारकीहोळी हे किरकोळ मतांनी पराभूत झाले होते अश्यावेळी सतीश जारकीहोळी हे सौन्दत्ती असो बेळगाव दक्षिण असो किंवा आणखी कोणता मतदारसंघ असो त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.