रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर झाडं कोसळून युवक जागीच ठार तर अन्य एक जखमी झाल्याची घटना आर टी ओ सर्कल पाच नंबर शाळेसमोर मंगळवारी सकाळी घडली आहे.
राकेश सुलधाळ वय 26 रा.सिद्धनहळळी बेळगाव असे या घटनेत मयत झालेल्या युवकाच नाव आहे तो दुचाकीवरून आर टी ओ कडून कोर्ट कडे जात होता अन्य एक दुचाकीस्वार या घटनेत जखमी झाला आहेत्याला इस्पितळात दाखल कऱण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून परतीचा जोरदार पाऊस सुरू आहे अश्यात अनेक घरे झाडे कोसळत आहेत बेळगाव शहरातील आर टी ओ ते कोर्ट पर्यंतच्या परिसरात रस्त्याशेजारी मोठी मोठी झाडे आहेत चव्हाट गल्ली 5 नंबर शाळे समोर ही घटना घडली आहे.
मंगळवारी सकाळी मोठ्या आकाराचे झाड दुचाकीवर कोसळून युवक ठार तर अन्य एक जखमी झाला आहे घटनास्थळी मार्केट ए सी पी एन व्ही भरमनी पी एस आय विठ्ठल हावनावर यांच्यासह पोलिस आणि वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन रहदारीचा अडथळा दूर करत रस्त्यावर कोसळलेल्या झाडाच्या फांद्या बाजूला करण्यात येत आहे.
मागील तीन चार महिन्यापूर्वी क्लब रोड वर देखील अश्याचं घटनेत वृद्ध ठार झाला होता तर सिव्हिल इस्पितळ रोडवर झाड कोसळून पार्किंग केलेल्या दुचाकी चक्काचूर झाल्या होत्या एकूणच रस्त्या शेजारील जुनाट वृक्षांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.