Friday, April 26, 2024

/

नेगीनहाळ स्वामीजींच्या आत्महत्येने खळबळ

 belgaum

बैलहोंगल तालुक्यातील नेगीनहाळ गावात असलेल्या मुडीमाळेईश्वर मठाचे मठाधीश बसव सिद्धलिंग स्वामीजी यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे आहे.

स्वामीजींच्या आत्महत्येची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्याबरोबरच तपास कार्य हाती घेतले आहे केला. गेल्या कांही दिवसांपूर्वी महिलांसंदर्भातील विविध स्वामीजींच्या गैरप्रकाराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.Swamiji

या व्हिडिओमध्ये आत्महत्या केलेल्या बसव सिद्धलिंग स्वामीजींचे देखील नांव होते असे बोलले जाते. या प्रकरणातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा कयास असला तरी नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

 belgaum

बसव सिद्धलिंग स्वामीजींनी काल रविवारी रात्री आपल्या राहत्या जागेत आत्महत्या केली याप्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.