सण समारंभाची चाहूल लागते ती बाजारपेठ मधूनच यामुळे बाजारपेठा जणू आपल्या दैनंदिन जीवनाचे दर्शनच घडवितात. यामुळेच सध्या बाजारपेठेत शांतता असून पितृपंधरवडा सुरू असल्याने बाजारपेठेत म्हणावा तितका उठाव नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मागील पंधरवड्यात बाजारपेठा फुल्ल दिसत होत्या खरेदी बरोबरच नागरिकांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होती.मात्र पितृपक्ष म्हणजेच महाळ महिना सुरू झाल्यापासून बाजारपेठेतील वर्दळ मंदावली असून परिणामी व्यवहार देखील ठप्प असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पितृपक्षात प्रामुख्याने शुभ कामे न करण्याची प्रथा आहे. यामुळे गरजेच्या वस्तू खेरीज इतर व्यवहार मंदावले आहेत आता पुढील आठवड्यात नवरात्र उत्सव येऊ घातला असून त्यावेळी बाजारपेठेत पुन्हा उठाव असल्याचे चित्र दिसून येईल.
मात्र सध्या बाजारपेठेमधून शुकशुकाटच अनुभवयाला मिळत आहे. शनिवारी आणि रविवारी प्रामुख्याने आठवडी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो त्यावेळी आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणात होते. ग्रामीण भागातून नागरिक शहरात खरेदीसाठी येतात मात्र सध्या महाळ महिना असल्याने बाजारपेठ मध्ये म्हणावी तितकी गर्दी नसल्याचे दिसून आले.
पितृ पक्षांमध्ये मृत व्यक्ती म्हणजेच पित्राना नैवेद्य ठेवण्याची पद्धत आहे. यामुळे या काळात पित्राचे स्मरण केले जाते. शुभ कार्य केले जात नाही परिणामी बाजारपेठे मधील वर्दळ आणि आर्थिक व्यवहार ठप्प असल्याचे दिसून येत आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल झाल्याचे चित्र दिसून आले होते.
मात्र गणपती विसर्जन झाल्यानंतर महाळ महिना सुरू झाल्यापासून बाजारपेठेमध्ये शांतताच अनुभवायला मिळत आहे. बाजारपेठेतील चढ-उतार प्रामुख्याने मानवी जीवनाशी निगडित असल्याने 26 सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार असून पुढील आठवड्यात पुन्हा बाजारपेठेतील चित्र पालटणार असल्याचे मत व्यापारामधून बोलले जात आहे.