दुकान बंद करून गोकाकहुन सिंधी कुरबेटकडे जाणाऱ्या दोघं सराफांवर आठ दरोडेखोरांनी जीवघेणा हल्ला करून अर्धा किलो सोन्याचे दागिने आणि 2 लाख 80 हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडे आठ वाजता घडली आहे.
यामध्ये संजीव सदानंद पोतदार आणि रवींद्र सदानंद पोतदार हे सराफ जखमी झाले असून घटप्रभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव जिल्ह्यात लुटीच्या घटना सातत्याने समोर येत असताना बेळगाव जिल्ह्यात धाडसी दरोडा पडला आहे.
गोकाक हुन सिंधी कुरबेटकडे दुचाकीवरून जाणाऱ्या संजीव सदानंद पोतदार आणि रवींद्र सदानंद पोतदार या दोघा सोन्याच्या व्यापाऱ्यांना आठ जण दरोडेखोरांनी अडवून त्यांच्यावर हल्ला करत अर्धा किलो सोने, दोन लाख 80 हजार रुपये रोख रक्कम हिसकावून घेतली.
दोघा सोन्याच्या व्यापाऱ्याना घटप्रभातील के एच आय इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गोकाक मधील आपले सोन्याचे दुकान बंद करून आपल्या मूळ गावी सिंधी कुरबेटला ते दुचाकीवरून गोकाक होऊन परतत होते. तेव्हा रात्री साडेआठच्या दरम्यान साखर कारखान्याजवळ चार दुचाकी वरून आलेल्या आठ जण अज्ञात आणि त्यांच्या अडवून त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि सोने लंपास केले.
दोघा व्यापाऱ्यापैकी एका व्यापाऱ्याच्या डोक्यावरून एकाच्या कानावर लोखंडी रॉड ने हल्ला करून त्यांना जखमी करून रोख रक्कम आणि सोन्याच्या वस्तू लंपास केल्या आहेत. याप्रकरणी बेळगावचे पोलीस प्रमुख संजीव पाटील यांच्या नेृत्वाखाली तपास कार्य सुरू आहे.