बाहेर गावाहून बेळगाव शहरात कामासाठी येणाऱ्या महिलांना सुरक्षित वास्तव्य उपलब्ध करून देण्यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याने शहरात तीन ठिकाणी उद्योगस्त महिलांसाठी निवासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
जैन इंजिनिअरिंग कॉलेज जवळ मच्छे, जीआयटी कॉलेज जवळ उद्यमबाग आणि आजम नगर येथे महिलांच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. नोकरीच्या निमित्ताने बेळगाव शहरात येऊन वास्तव्य करणाऱ्या महिलांची त्यामुळे सोय होणार आहे.
शाळा आणि महाविद्यालय, शासकीय विभाग, कारखाना, हॉटेल, रुग्णालय, गारमेंट अशा सरकारी आणि खासगी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना ही निवासी सुविधा उपलब्ध आहे. महिलांना अल्प मासिक भाड्यात ही व्यवस्था उपलब्ध असेल. अधिक माहितीसाठी उपसंचालक महिला आणि बाल कल्याण खाते शिवाजीनगर येथे संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
प्रत्येक निवासी घरात ४० महिलांना अत्यल्प दरात राहण्याची सोय असेल. अनुसूचित जाती आणि जमाती, अल्पसंख्याक, बीपीएल कार्डधारक महिलांना येथे मोफत प्रवेश दिले जाईल.
स्वच्छतागृह, सकाळचा नाष्टा दुपारचे आणि रात्रीची जेवणाची व्यवस्था, सोलारचे गरम पाणी, पिण्याचे पाणी, 24 तास वीज पुरवठा, महिलेला सहा वर्षाखालील लहान मुल असल्यास त्यासाठी शिशुपालन केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रथम येणाऱ्याला प्राधान्य अशा पद्धतीने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.